Breaking News

राज्य सरकारच्या विरोधात पप्पू कागदे यांचा एल्गार : किशन तांगडे


पदोन्नती मधील आरक्षणासाठी लाखो भीम सैनिक उतरणार रस्त्यावर 

राज्यभरात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे यांच्या नेतृत्त्वाखाली होणार तीव्र आंदोलन 

                 

बीड :  पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, या मागणीसाठी येत्या ०१ जून ते ०७ जून पर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.ना.रामदासजी आठवले यांच्या आदेशाने रिपाईचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पुजी कागदे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.


          महाविकास आघाडी सरकार हे स्वतःला कितीही  पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागसावर्गीयांच्या आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडीचा बुरखा फाटला आहे. महाविकास आघाडी सरकार हे गोरं-गरिब, मागासवर्गीय आणि दीन- दलित विरोधी सरकार ठरले आहे. मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरीत घ्यावा. या मागणीसाठी राज्यभर प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यलयावर ०१ जून ते ०७ जून च्या दरम्यान रिपाइं तर्फे आंदोलन सप्ताह जाहीर करण्यात आला आहे.

या आंदोलनात कोरोना प्रसाराचे सर्व नियम व अटी पाळून गर्दी न करता आंदोलन करण्यात येणार आहे. मागासवर्गीयांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणाऱ्या या कुचकामी आघाडी सरकारला धडा शिकविण्यासाठी मा.ना.रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा प्रदेश अध्यक्ष पप्पुजी कागदे यांच्या नेतृत्त्वाखाली होणाऱ्या आंदोलनात राज्यभरा तील लाखो स्वाभिमानी भीमसैनिक कोरोना चे सर्व नियम व अटी पाळून सहभागी होणार असल्याची माहिती रिपाईचे बीड तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांनी दिली.


No comments