Breaking News

जहाँ मुसीबत खडी है ! वहाँ बंदा हारूनभाई हाजीर हैं !


हारून भाई इनामदार यांची जनविकास परिवर्तन आघाडी म्हणजे केजकरांची लाईफ लाईन !

जागतीक पत्रकार दिनाचे औचित्य साधुन पत्रकार, श्रमिकांना ही केले जिवनावश्यक किराणा साहित्य वाटप !

गौतम बचुटे । केज 

केज शहरातील जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई ईनामदार यांनी जागतिक पत्रकार दिनाचे औचित्य साधुन केज मधील गरजू पत्रकारांना किराणा साहित्यांचे वाटप करण्यात आले.

कोरोना महामारीच्या काळात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकार बांधव यांच्या बरोबरच श्रमिक कामगार यांनाही किराणा किटचे वाटप करून समाजाचा खरा जाणता असल्याचे दाखवून दिले. केजमध्ये बरेच जण पैशाने श्रीमंत आहेत पण मनाने नाहीत. समाजाची खरी गरज ओळखुन याची जाणीव हारून इनामदार यांना असल्याचे पुन्हा एकदा दाखवुन दिले. प्रत्येकांच्या अडी- अडचणी जाणून घेऊन; त्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात. 

या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी काम करत राहणे माझे कर्तव्य आहे. संपूर्ण केज हे माझे कुटुंब म्हणून मी त्यांची सेवा करत आहे. भले माझ्या कडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी माझ्या कुटुंबासाठी काही देऊन हातभार लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केज वासीयांसाठी पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.तो ही माझ्या स्वतःच्या पैश्याने विविध ठिकाणी पाण्यासाठी लागणारे टँकर असो किंवा बोअर असेल ते दुरुस्त करून या कोरोना महामारीच्या काळात केज वासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून वेळोवेळी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे.

कोरोना काळ हा खूप भयानक काळ आहे. या मध्ये माणुसकी या नात्याने फक्त आधार देण्याची गरज आज दिसून येत आहे. सध्या कांहीजण फक्त राजकारणा पूरते बाहेर येतात. अशा संकटाच्या वेळी आपल्या घरात बसतात. तसा मी नाही. मी या केज वासिंयासाठी रात्र अन दिवस एक करून या काळात मदत करायला तयार आहे. फक्त या काळात तरी राजकरण न करता आपण समाजासाठी काही देणे लागतो. याचा विचार करावा. संपूर्ण केज वासियासाठी लागेल ते मदत करून केज वासीयांना आधार द्यावा.   जागतिक पत्रकार दिवसाचे औचित्य साधून कोरोना काळात  किराणा साहित्य वाटप करून एक कौटुंबिक आधार देण्याचे महान कार्य जनविकास आघाडीच्या वतीने हारून भाई इनामदार यांनी केले. असे उदगार पत्रकार बांधव यांनी काढले.

 

No comments