Breaking News

आ. सुरेश धस यांनी संकटात जनसेवेचा स्तंभ उभा केला आरोग्य उपसंचालक माले यांच्याकडून आ. धस यांचे कौतुक


उस्मानाबादेच्या लोहारा व लातूरच्या जळकोट येथे आ.सुरेश धस यांनी ऑक्सिजन काँन्सट्रेटर दिले मशीन 

 के. के. निकाळजे । आष्टी 

तीन जिल्ह्याचे आमदार हा लौकिक सातत्याने सिद्ध करत आ.सुरेश धस हे कोरोनाच्या संकटकाळात जनसेवेत कटिबद्ध आहेत. आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघात १३ कोविड केयर सेंटर उभारून कोरोनाचा विषाणूची अन भिती घालवण्याचे काम आ. सुरेश धस यांनी करून आदर्श व्यवस्थापन व नेतृत्व संपूर्ण राज्याला दाखवून दिले आहे. आष्टी येथे आरोग्य उपसंचालक माले, जिल्हा आरोग्य अधिकारी आर. बी.पवार, तहसीलदार आष्टी राजाभाऊ कदम यांच्या उपस्थितीत २६ स्थानिक प्राधिकारी मतदार संघातील लोहारा  जि. उस्मानाबाद व जळकोट जि.लातूर या दोन्ही शहरातील रुग्णांसाठी दोन ऑक्सिजन काँन्सट्रेटर मशीन सुपूर्द केले.

       आष्टी येथे कोरोना उपचारात आवश्यक असणारी ही यंत्र सामुग्री सुपूर्द करण्यात आली. यावेळी आरोग्य उपसंचालक माले यांनी आ. सुरेश धस यांनी कोरोनाच्या संकटात हजारोंच्या संख्येने कोव्हिड बेड उपलब्ध करून संकटात जनसेवेचा स्तंभ उभा केला असल्याचे सांगत मनापासून कौतुक देखील केले. जनतेला आधार अन कोरोनाचा योग्य वेळी योग्य उपचार मिळणे आवश्यक असून आम्ही तेच करत आहोत. संपूर्ण बीड जिल्ह्यासह उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती कशी आटोक्यात येईल यासाठी आम्ही तर प्रयत्न करतच आहोत मात्र यामध्ये आमच्यासह सर्वांनी पुढे येऊन प्रयत्न करायला हवेत असे आ.सुरेश धस यांनी यावेळी म्हंटले. डॉ. मार्कंडे, पं.स. सदस्य यशवंत खंडागळे, नगरसेवक मनोज पाटील, नगरपंचायत अधिकारी - कर्मचारी आदींची यावेळी उपस्थिती होती.


No comments