Breaking News

किरण जावळे यांची भाची सिद्धेश्वरी हिच्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथील निवारा बालगृहास धान्य देऊन केली मदत

आष्टी  : आष्टी येथील किरण जावळे यांनी त्यांची  भाच्ची सिद्धेश्वरी हिच्या वाढदिवसानिमित्त  ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा फाटा (समता भुमी)ता- जामखेड जि-अहमदनगर याठिकाणी अनाथ, निराधार ,ऊसतोडमजूर, विटभट्टी कामगार, भटके विमुक्त आदिवासी, वंचित, दुर्लक्षित घटकातील गोरगरीब मुला-मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या बालगृहातील अनाथ मुला-मुलींना आवडेल तो गोड खाऊ दिला व काही धान्य भेट देऊन  त्यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहासाठी पिण्याच्या पाण्याची पन्नास हजार लिटरची सिमेंट टाकी बांधण्याचे जाहीर केले, मुला-मुलींच्या मन पसंतीचे गोड खाऊ देऊन मुला-मुलींना आगळावेगळा  आनंद दिला.

त्याबद्दल  निवारा बालगृहातील आलेल्या मान्यवर किरण जावळे, विमल बुक्तर, राहुल बुक्तर, गणेश पवार व यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.डॉ अरुण जाधव यांनी त्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन निवारा बालगृह तर्फे आभार मानले,

    संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती संस्थेचे प्रकल्प समन्वयक संतोष चव्हाण यांनी दिली, हे बालगृह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, नोकरदार, व्यक्तीकडून    मिळणाऱ्या मदतीवरच  चालू असुन सदर बालगृहात 65 मुला-मुलांचे संगोपन लोक  सहभागातून व लोकवर्गणीतून केले जात असल्याचे सांगितले. यावेळी निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजीनाथ केसकर, संगीता केसकर, सविता शिंदे व  आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. 


No comments