Breaking News

सेवाधर्म: रविवारपासून राष्ट्रवादीची प्रोटीन बँक होणार सुरु;कोरोनाबाधित रुग्णांना मिळणार घरपोच अंडी व मटकी


⬛ जे जे कोरोना बाधितांना हवे ते ते आम्ही द्यावे:सेवाधर्म उपक्रमाचा संकल्प  ⬛

परळी वैजनाथ : ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या सेवाधर्म :सारे काही समष्टीसाठी उपक्रमांतर्गत सर्वांना अतिशय उपयुक्त ठरणारे सर्व स्तरीय व सर्वव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहेत. जे जे कोरोनाबाधितांना हवे ते ते आम्ही द्यावे असा जणु सेवाधर्म उपक्रमाचा संकल्पच आहे या पद्धतीने सेवाकार्य सुरू आहे.आता या उपक्रमांतर्गत कोरोनाबाधित व कोरोनामुक्त रुग्णांसाठी प्रोटीन बँक सुरू करण्यात येत आहे.रुग्णांना डॉक्टरांनी निर्देशित प्रोटिनयुक्त आहार मिळावा यासाठी रविवारपासून कोरोनाबाधित रुग्णांना मिळणार घरपोच अंडी व मटकी मिळणार आहे.

          राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या माध्यमातून व गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सेवाधर्म या उपक्रमात विविध सेवाकार्य सुरू आहेत.यामध्ये नागरीक व रुग्णांची गरज लक्षात घेऊन सर्वांना अतिशय उपयुक्त ठरणारे सेवाकार्य सुरू आहे.  सध्या कोविड १९ ने वातावरण व्यापुन टाकले आहे.या परिस्थितीत रुग्णांना प्रोटीन युक्त आहार घ्यावा असे डॉक्टर निर्देशित करतात.परंतु सर्वच रुग्ण याप्रमाणे आहार घेऊ शकतील असे नाही.अडचणीत असणारे व गरजु रुग्णांना प्रोटीन युक्त आहार उपलब्ध व्हावा यासाठी कोरोनाबाधित व कोरोनामुक्त रुग्णांसाठी प्रोटीन बँक सुरू करण्यात येत आहे. 

        कोरोनामुळे त्रस्त असलेल्या व डॉक्टरानी प्रोटीनयुक्त आहार सांगितला आहे अशा नागरिकांना लॉकडाउनमुळे अडचण येत आहे. त्यामुळे सेवाधर्म टीम आता कोरोना बाधित व कोरोनामुक्त  रुग्णाना देणार घरपोच उकडलेली अंडी व स्वादिष्ट मटकी मोफत देणार आहे. या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शहर सरचिटणीस अनंत इंगळे आदी पदाधिकारी यांनी केले आहे. या सेवाकार्यासाठी  शेख मुख्तार ८३२९९४२२४६, शेख शारेख ९२२५४९९४९४, शरद कावरे ८३२९६७४११३, रवी सोरडगे ७२७६६८९०९० या आरोग्यसेवकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. 


No comments