Breaking News

आ.संदिप भैय्या यांच्या प्रयत्नातून अनेक वर्षापासूनचा पिंपळवाडी-भाळवणी पुलाचा प्रश्न मार्गी


महाविकास आघाडी सरकारने दिला साडे पाच कोटीचा निधी

पिंपळवाडी, भाळवणी परिसरातील नागरीकांनी मानले आभार

बीड :  पिंपळवाडी ते भाळवणी रस्त्यावर बिंदुसरा नदीवर पुल नसल्याने शेतकरी, विद्यार्थी ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत होते. यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली, पुल करण्यात यावा अशी मागणी सातत्याने या भागातील नागरीक करत असतांना देखिल त्याकडे तत्कालीन सत्ताधार्‍यांनी दुर्लक्ष केले. आ.संदिप भैय्या क्षीरसगार यांनी या भागातील लोकांची मागणी लक्षात घेता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत 2019-20 एडीबी बॅच 2 अंतर्गत डिपीआर, एसक्युएम तयार करून सदर प्रश्न मार्गी लावला आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून पिंपळवाडी-भाळवणी पुलासाठी साडे पाच कोटी रूपयाचा निधी देण्यात आलेला असून याबाबत 28 मे रोजी शासन निर्णय, ग्रामविकास विभागाने निर्गमीत केला आहे. 
बीड तालुक्यातील पिंपळवाडी ते भाळवणी रस्त्यावर सा.क्र.0/210 येथे बिंदूसरा नदीवर पुल बांधकाम व पाच वर्षे देखभाल  दुरूस्तीसाठी त्याचा आराखडा बनवून आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी बनवून घेतला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन 2019-20 एडीबी बॅच 2 अंतर्गत काम मंजूर व्हावे यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्यात ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह सचिव मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांच्या आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी वेळोवेळी भेटी घेतल्या. या रस्त्यावरील पुल होणे गरजेचे आहे. हे महाविकास आघाडीतील नेते मंडळींना पटवून दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या पुलाच्या बांधकामासाठी साडे पाच कोटी रूपयाचा निधी दिला आहे. 
पिंपळवाडी ते भाळवणी रस्त्यावरील बिंदूसरा नदीपात्रात पुलाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचे व पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.सतिष चव्हाण व महाविकास आघाडीतील नेते मंडळींचे या भागातील नागरीकांनी आभार मानले आहे. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शाम तुपे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, प्रा.पंडित तुपे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, पिंपळवाडीचे सरपंच संदिप धुमाळ, सय्यद शाहेद, योगेश बहिरवाळ, सुभाष बहिरवाळ, कुंडलिक धसे, लिंबागणेशचे माजी सरपंच बाळासाहेब मुळे, राहुल साळवे, राम बहिरवाळ, असाराम बहिरवाळ, आकाश बहिरवाळ, नितीन चव्हाण, बाळासाहेब कळसाणे, संदिप उबाळे यांच्यासह पिंपळवाडी, भाळवणी, सुर्याचीवाडी, देवर्‍याचीवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. 

बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना
पिंपळवाडी-भाळवणी पुलाचा प्रश्न सत्तेत असतांना सोडवता आला नाही. आता सत्ता नाही, सरकार नाही, त्या कामाच कसलाही पाठपुरावा केलेला नाही असे असतांनाही केवळ श्रेय घ्यायचे म्हणून पत्रकबाजी करून आपणच काम मंजूर करून आणले. अशी टमकी वाजवणे म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना असा टोला या भागातील नागरिकांनी फुकटचे श्रेय घेणार्‍या जिल्हाध्यक्षांना लगावला आहे. सदर काम 2019-20 मध्ये आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या सूचनेवरून आराखड्या समाविष्ट झाले. डिपीआर, एसक्युएम आ.संदिप भैय्यांनी तयार करून एडीबीच्या सहाय्याने ग्रामविकास विभागामार्फत हे काम महाविकास आघाडीकडून मंजूर करून घेतले आहे. हे या भागातील जनतेला चांगलेच माहित आहे. 

No comments