Breaking News

भाकरी देणाऱ्या हातांना जिओ जिंदगीकडून मोफत उपचाराची साथ

आजची सेवा सहकारी स्व वैभव बेरड यास समर्पित - डॉ सचिन घोरड

जुजगव्हाण, काळेगाव (ह) येथे 150 पेक्षा अधिक लोकांवर उपचार

बीड :  भाकरी थापणाऱ्या अन देणाऱ्या हातांना मोफत वैद्यकीय सेवेची साथ जिओ जिंदगी अभियानाच्या वतीने दिली जात आहे. बीड तालुक्यातील काळेगावकरांनी अँटीजन कॅम्पप्रमाणेच मोफत फिरत्या दवाखान्याला देखील उस्फुर्त प्रतिसाद दिला. 111 पेक्षा अधिक लोकांनी यावेळी तपासणी करून घेत मोफत औषधोपचाराचा लाभ घेतला तर जुजगव्हान येथे 42 पेक्षा अधिक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. या दोन्ही ठिकाणी डॉ सचिन घोरड यांनी सेवा दिली. दोन्ही गावकऱ्यांच्या वतीने सर्व टीमचे स्वागत करण्यात आले.

जिओ जिंदगी अभियानाच्या वतीने गेल्या वर्षी भुकेलेल्यांना भाकरी दिलेल्या गावांमध्ये मोफत औषधोपचार केला जात आहे. 3 दिवसांपूर्वी मयत झालेले सहकारी स्व वैभव बेरड यांच्या स्मृतीस आजची सेवा समर्पित करत असल्याचे डॉ सचिन घोरड यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिओ जिंदगीचे लोकपत्रकार भागवत तावरे, भास्कर ढवळे सर, मुक्त पत्रकार संतोष ढाकणे, धनंजय गुंदेकर, सेवारथी राम फलके, सामाजिक कार्यकर्ते अजय सुरवसे आदी तर काळेगाव येथील सरपंच बाळकृष्ण पवार, आधार माणुसकी ग्रुपचे रणजित पवार, अविनाश गवळी, कानतोडे साहेब, श्याम जी राऊत, घोडके साहेब, गाडे साहेब, आबासाहेब आगलावे,  अन्नासाहेब, धुमाळ, पवार आदींची उपस्थिती होती. तर जुजगव्हान येथे उपसरपंच रवी गंगावणे, फौजी आण्णा सुरवसे, रमेश ढवळे,शहाजी ढवळे, परमेश्वर दसुरवसे, कृष्णा सुरवसे, महादेव सुरवसे आदींसह गावकरी उपस्थित होते. 

No comments