Breaking News

वैभव साळुंके लिखित धगधगतं शंभुपर्व ह्या कादंबरी चे प्रकाशन

परळी : महाराष्ट्राचे लाडके कविराज अशी ओळख निर्माण करणारे, मराठ वाड्या चे सुपुत्र, युवा लेखक वैभव साळुंके ह्यांच्या धगधगतं शंभुपर्व ह्या कांदबरी चे प्रकाशन दिनांक १४ मे रोजी पार पाडले,  वैभव साळुंके  ह्यांनी ह्या आधीच छञपती संभाजी महाराज ह्यांच्या जीवनचरित्रा वर जगातले पाहिले उत्तरकालीन महाकाव्य  लिहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले  . ह्या कादंबरी तुन त्यांनी छञपती संभाजी महाराज ह्यांची कारकीर्द शब्द सामर्थ्याच्या जोरावर उभी केली आहे, इतिहास आणि साहित्य लेखनासाठी तरुण वयात असलेल्या ह्या धडपडीच कौतुक महाराष्ट्रभरातून घेतली आहे, कसलाही ऐतिहासिक वा साहित्यिक लेखनाचा वारसा नसताना वैभव साळुंके ह्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. वैभव साळुंके ह्यांना आजवर सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे किल्ले सिंहगड येथे सिंहगर्जना पुरस्कार , ह्या सह युवा भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 


Social media वर त्यांचे अनेक ऐतिहासिक लेख viral आहेत, ते छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तुळापूर ह्या सामाजिक संघटनेत महाराष्ट्र राज्य प्रवक्ते पदावर कार्यरत आहेत. त्यांनी  स्वतः च्या आई  रंजनाबाई किसनराव साळुंके, काकी भारतबाई शामराव साळुंके, वंदनाबाई नरसिंग साळुंके,  आणि सुलक्षणा बाऊ शामराव साळुंके ह्यांच्या हस्ते कादंबरी वाचकाना अर्पण केला, प्रकाशन सोहळ्या वेळी बोलताना लेखक वैभव साळुंके म्हणाले , की शंभूराजे चा त्याग बलिदान आणि स्वराज्याप्रती असलेले समर्पण तरुण पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे. 


No comments