Breaking News

शेतकरी बांधवांना कोरोना महामारीत विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करा- मा.आ.भीमसेन धोंडे


तात्काळ अँटीजन किट उपलब्ध करून गावेगावी मोफत अँटीजन चाचणी सुरू करा पत्रकार परिषेदेत मा. आ.भीमसेन धोंडे   यांची मागणी 

आष्टी :  यावर्षी खताचे भाव गगनाला भिडले आहेत. परंतु ब-याच दुकानदारांकडे मागील वर्षाचा स्टाॅक शिल्लक असून, ते खत मागील वर्षाच्याच भावात विकावे त्याचा भाव वाढू नये, तसेच कोरोनाची महामारी वाढतच असून, आष्टी येथे ऑक्सीजन प्लांटची मंजूरी मिळाली असली तरी अजूनही प्रत्यक्षात कामाला सुरूवात झालेली नाही. लवकरात लवकर आष्टी येथील ऑक्सीजन प्लांटचे काम कराच पण शिरूर आणि पाटोदा येथे लवकरात लवकर सुरू करावे. तसेच ग्रामीण रुग्णालय येथे मोफत अँटीजन चाचणी गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून तात्काळ अँटीजन किट उपलब्ध करून गावेगावी अँटीजन चाचणी सुरू करावी आणि त्यासह लसीकरणही प्रत्येक ग्रामपंचायत निहाय करावे अशी मागणी ही मा.आ.भीमसेन धोंडे यांनी केली आहे.

          आष्टी येथील पंडीत जवाहर नेहरू विद्यालयाच्या कार्यालयात आज मंगळवार दि.18 रोजी सांयकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत मा.आ.धोंडे बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले, खरीप हंमागाची आता सुरूवात झाली असून, आता खताचे भाव गगनाला भिडले आहेत. खताचे भाव 26:26 चा 1100 रुपयावरून 1700 वर गेला आहे. प्रत्येक खताचे भाव हजार पाचशे रूपयाने वाढले आहेत. आगोदर खताचा कच्चा माल हा चीन वरून आपल्याला मिळत होता. 

आता चीन वरून येणारा कच्चा माल बंद झाल्याने भाव वाढ झाली आहे. परंतु ब-याच दुकानदारांकडे मागील वर्षाचा खताचा साठा शिल्लक असून, तो मागील वर्षीच्याच भावात विक्री करावा यासाठी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच आता पेरणीसाठी लागणारे बियाणे ही सरकारने मागील वर्षाच्या भावातच द्यावे, तसेच कोरोना महामारीत शेतकरी व शेत मजुरांना सरकारने विशेष आर्थिक पॅकेज देणे गरजेचे आहे. तसेच शेतक-यांच्या शेतामध्ये जे शेती मध्ये काम करणारे कामगार आहेत त्यांचा पगार एमआरईजीएस मधून द्यावा ही मागणी मागील पंचवीस वर्षापासून असून, ही मागणी राष्ट्रवादी, काॅग्रेस पक्षानेही केली आहे. आता त्यांची सत्ता आहे, त्यांनी ही मागणी पुर्ण करावी असे आवाहनही मा.आ.भीमसेन धोंडे यांनी केली.

       आष्टी येथे ऑक्सीजन प्लांटची मागणी आपण दोन महिन्यापुर्वीच केली होती. परंतु अजूनही काम सुरू केलेले नाही. आष्टीचे काम तर लवकर कराच पण शिरूर आणि पाटोदा साठी ही ऑक्सीजन प्लांट उभारणे गरजेचे आहे. तसेच लसणीकरणाच्या बाबतीत ही आष्टी मतदार संघात पाठपुरवठा करून ग्रामपंचायत निहाय या लसीकरणाची सुरूवात करणे आवश्यक असल्याचेही मा.आ.भीमसेन धोंडे यांनी सांगितले.

No comments