Breaking News

शेतातील नाली खोदन्याच्या कारणा वरून उमरीत दोन गटात तुंबळ हाणामारी


एकमेकांन विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेले दोन्ही गट पुन्हा पोलीस स्टेशन आवारातच एकमेकास भिडले !

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील उमरी येथे शेतीच्या वादातून नाली खोदान्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. तसेच पुन्हा पोलीस स्टेशन आवारातही त्यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली.

या बाबतची माहिती अशी की, उमरी ता केज येथे भाऊराव चाळक आणि शेख अली अकबर यांची शेजारी जमीन आहे. दि.९ मे रोजी दुपारी ३:०० वा. च्या दरम्यान या दोन्ही गटात शेतातील जुन्या भांडणाची कुरापत काढून व शेतातील नाली खोदन्याच्या कारणा वरून दोन्ही गट परस्पररांशी भिडले. यात दगड, विटा आणि लाठ्या काठ्यानी त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात एकाच्या उजव्या हाताची करंगळी तुटली आहे तर एकाचे दात पडले आहेत. अन्य एकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. याची माहिती पोलिसांना मिळताच उमरी येथे पोलीस पथक पोहोचले आणि त्यांनी हसक्षेप करून भांडण सोडविले.

त्या नंतर दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यासाठी केज पोलीस ठाण्यात समोरा समोर येताच पुन्हा त्यांच्यात तुंबळ फ्री स्टाईल हाणामारी आणि दगडफेक झाली. त्यांच्या पैकी एकाच्या बोलेरो गाडीवरही दगडफेक करण्यात आली. दोन्ही गटातील स्त्री व पुरुष मिळून सुमारे १२ ते १३ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहीती आहे. या भांडणातील दगड दोन बोलेरो गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


No comments