Breaking News

सारथी चे प्रश्न मार्गी लागणार : आ. विनायकराव मेटे

सारथी संस्थेत एम. फील करणाऱ्या विद्यार्थ्याना  मिळणार फेलोशिप  

सारथी संस्थेमधील विद्यार्थ्याचे अनेक प्रश्ने पुणे येथील बैठकीत लावले मार्गी  

 पुणे येथील सारथी संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. याबाबतीत अनेक तक्रारी निवेदने व पाठपुरावा करूनही हे पश्ने मार्गी लागत नव्हते. पी. एच.डी करणारे 241 विद्यार्थी विद्यार्थिनी नोंदणी करून त्याच्या मुलाखती घेण्यात आलेल्या होत्या, परंतु गेल्या एक ते दीड वर्षापासून या मुलामुलीना एक पैशाचीसुद्धा फेलोशिप मिळालेली नव्हती. त्यामुळे त्यांचे संशोधनाचे काम थांबले होते. याच बरोबर केंद्र शासनाने एम. फिलचा कोर्स बंद केल्यामुळे जे एम. फिल. करणारे विद्यार्थी होते त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. प्रशिक्षणाबाबत देखील अनेक अडचणी होत्या. यासर्व प्रश्नाबाबात संबंधीत अधिकारी, लोकप्रतिनिधी व मंत्री यांच्यास्तारावर पाठपुरावा केला परंतु त्या विदयार्थ्याची दाखलही घेण्यात आली नाही.

मागील आठवड्यात याबाबत विद्यार्थ्यांनी आ. विनायकराव मेटे यांची भेट घेतली व सर्व अडचणी विस्तृतपणे त्यांच्यासमोर मांडल्या. त्या अनुषंगाने आ. विनायकराव मेटे यांनी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्याकडे सर्व प्रश्नाबाबत चर्चा केली आणि अजितदादा पवार यानी या सर्व बाबीची दखल घेऊन सारथीचे अध्यक्ष मा.अजित निंबाळकर (माजी मुख्य सचिव.म.रा.) यांना योग्य त्या सूचना दिल्या व आ. विनायकराव मेटे यांच्या विनंती नुसार विदयार्थ्याच्या समवेत एकत्रित बैठक पार पाडली. यामध्ये येत्या 1 जूनला सारथीची संचालक सडळाची बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीत सारथी संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विदयार्थ्याचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे ठरले आहे.  असे आ. मेटे यानी सांगीतले.

आ. विनायकराव मेटे यांनी सारथी संस्थेबाबत अनेकवेळा व्यथा मांडल्या असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथीसाठी संस्थेसाठी संस्थेच्या मालकीची स्वतःची जागा पुण्यासारख्या ठिकाणी उपलब्ध करून सर्व अत्यावश्यक सोयी सुविधा देण्याचे मान्य केले आहे तसेच सारथी मध्ये सध्या फक्त पाच ते सहा कर्मचारी आहेत तर त्या ऐवजी सारथी संस्थेसाठी 41 नवीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करण्याची परवानगीह प्राप्त आहे. त्यामुळे सारथी संस्थेबाबत आ. मेटे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. येत्या एक जुन रोजीच्या बैठकीमध्ये सारथी संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या अडचणी दूर होऊन दहा जुन पर्यंत सर्व प्रश्ने मार्गी लागतील व या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे हे सर्व निर्णय पारित होतील असा विश्वास आ. विनायकराव मेटे यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

No comments