Breaking News

रीनैसंस द स्टेट" या पुस्तकांवर तात्काळ बंदी घाला - विजय दराडे


दिंद्रुड
: गिरिश कुबेर नामक लेखकाने छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण Renaissance State:The Unwritten story of the Making of Maharastra या पुस्तकामध्ये   केले असून यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष विजय दराडे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फ़त मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कड़े निवेदना द्वारे केली आहे.स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज साहित्यिक होते.संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होत.चारित्र्यसंपन्न व स्वराज्य निष्ठीत,स्वराज्यरक्षक, असणार्या राजावर रयतेच सुध्दा प्रचंड प्रेम होत. अशा छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणं हा जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे.  

छ.संभाजी महाराजांच्या विरोधात अनाजीपंत यांनी ज्या पध्दतीने षडयंत्र करून छत्रपती संभाजी महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याच पध्दतीने छ.संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याच काम आजही कथा,कांदबर्या,मालिका व पुस्तकातून वेळोवेळी होत आहे.परंतु छत्रपती शिवाजी महाराज ,छ.संभाजी महाराज यांच्या विचारांचे मावळे म्हणून आम्ही छत्रपतींची बदनामी सहन करणार नाही.या पुस्तकामुळे आगामी काळात महाराष्ट्राला अस्थिरतेचा धोका निर्माण होऊ शकतो.कुबेर यांचे लेखन समस्त महाराष्ट्रवासियांची मान शरमेने खाली जाईल असेच आहे.आम्हा सगळ्या इतिहास संशोधक - अभ्यासकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आमची आपल्याला विनंती राहील की "रीनैसंस द स्टेट" या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी तसेच बाजारत विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाच्या ताब्यात घ्यावीत.

      जो पर्यंत लेखक गिरिश कुबेर आणि प्रकाशक  हार्पर कॉलिंस हा वादग्रस्त मजकूर पुस्तकातून काढून टाकत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासनाने सर्व वितरकांना हे पुस्तक शासन दरबारी जमा करण्याचे आदेश द्यावेत. कुबेर हे एका दैनिकाचे संपादक म्हणून ओळखले जातात. ते अभ्यासून प्रकटतात असेही बोलले जाते. ते छ. संभाजी महाराजांविषयी आज्ञानातून लेखन करतील असे वाटत नाही. त्यामुळे कुबेर हे या त्यांच्या पुस्तकात छ. संभाजी महाराजांविषयी असे बिनबुडाचे लिखाण करतात या मागे त्यांचा हेतू काय आहे ? याचीही चौकशी झाली पाहीजे. आपण या संवेदनशील विषयामधे लवकरात लवकर लक्ष घालावे व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा लेखक कुबेर आणि प्रकाशक हार्पर कोलिन्स यांच्या विरोधात आम्ही फिर्याद दाखल करु व संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन करु याची आपण नोंद घ्यावी. तसेच सरकारने सदर पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने करत आहोत.

No comments