Breaking News

शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कोरोना शहिद योध्दास कसा सन्मान द्यावा हे महाराष्ट्र शासनाने दिल्ली राज्य सरकार यांच्याकडून शिकावे : रमेश पोकळे

बीड : दिल्ली राज्य शासनाने कोरोना योध्दा म्हणून कार्यरत असलेले शिक्षक शहिद झाल्यानंतर त्यांच्या कुटूबियांना 1 कोटी रू देवून कुटूंबातील 1 व्यक्ती  शासकीय सेवेत घेण्याचा जाहिर केले आहे. .. अतिशय संवेदनशीलपणे घरी जावून खरा आधार देण्याचे काम मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांनी केले आहे. 

आपले महाराष्ट्र  राज्य शासन तर जे शिक्षक करोना योध्दा म्हणून कार्य करत आहेत..त्या सर्वाना अद्याप विमा संरक्षण  देखील देवू शकलेले नाही हि बाब अतिशय लाजिरवाणी व  खेदजनक वाटते..तेव्हा महाराष्ट्र राज्य शासनाने कोरोना महामारीत सेवा करत असलेल्या शिक्षकांना दुर्दैवाने कोरोना योध्दा म्हणून  शहिद झाल्यानंतर त्याचा व कुटूबियांचा सन्मान कसा करावा याचा आदर्श अरविंदजी केजरीवाल यांच्या शासनाकडून घ्यावा असे आवाहन अटल जनसेवक रमेशभाऊ पोकळे यांनी केले आहे. 


No comments