Breaking News

अखेर फुलचंद कराड यांनी चाक फिरवुन वाण धराणाचे पाणी नदीपाञात सोडले

परळी वै. : भाजपाचे जेष्ठनेते व वाण धरण  कृती समितीचे अध्यक्ष फुलचंद कराड  यांनी वाण धरणाचे पाणी नदीपाञात सोडा या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना काही दिवसापुर्वी समक्ष भेटुन मागणी केली होती.या मागणीला आज यश आले असुन इरिकेशन विभागाच्या अधिकारी समावेत फुलचंद कराड यांनी वाल फिरवुन नदीपाञात पाणी सोडले आहे परिसरातील शेतकऱ्यांचा ज्वलत पाणीप्रश्न मार्गी लागल्याने सर्वञ समाधान व्यक्त होत आहे. 


 

निसर्गाने साथ दिल्याने नागापुर ता.परळी येथील वाण प्रकल्पात भरपूर पाणीसाठा उपलब्ध असून आसपासच्या अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी वाण प्रकल्पाचे पाणी वाण नदी पात्रात सोडवे यामागणीचे निवेदन भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड व वाण धरण  कृती समितीचे अध्यक्ष फुलचंद कराड यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना दिले होते.

    नागापुर, लिंबोटा, नाथ्रा, बहादुरवाडी, पांगरी, दे.टाकळी, सबदराबाद, तडोळी, वडखेल आणि तळेगाव वरिल शिवारात सध्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची सध्या येथे टंचाई असून नदीपात्र कोरडे पडल्यामुळे विहीरी आटल्या आहेत. मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा ही प्रश्न गंभीर बनला आहे म्हणुन फुलचंद कराड यांनी निवेदन दिले होते.ही मागणी मान्य नाही झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा ही देण्यात आला होता. 

दरम्यान आज दि.17 मे रोजी जिल्हाधिकारी यांनी  फुलचंद कराड यांना आंदोलन करु नका   आम्ही आज पाणी सोडण्याची आॕर्डर काढत आहोत.त्या नंतर   जिल्हाधिकारी यांनी आर्डर काढुन लागलीच फुलचंद कराड यांना वाॕटसपवर पाठवली.लागलीच फुलचंद कराड यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांच्याशी संपर्क केला.व कनिष्ठ अभियंता कुरेशी यांच्या समवेत प्रकल्पावर जाऊन शेतकऱ्यांच्या उपस्थित वाॕल फिरवुन नदीपाञात पाणी सोडण्यात आले. या प्रसंगी बोलत असताना फुलचंद कराड यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे माजी पालकमंत्री भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप साहेब आरबीसी राउत साहेब, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सलगर कर, कनिष्ठ अभियंता कुरेशी व परिसरातील सरपंच चेअरमन व शेतकऱ्यांचे कराड यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी मंचक मुंडे, प्रशांत कराड, श्रीकृष्ण मुंडे,माधव मुंडे, रवी कराड, गोविंद मुंडे,विश्वांबर मुंडे,छत्रगुण मुंडे,प्रमोद मुंडे,मनोज मुंडे,सुशन मुंडे,वाल्मिक मुंडे,राजेभाऊ मुंडे,लहुदास मुंडे, नारायण दिवटे,लक्ष्मण दिवटे, गणेश दिवटे, सचिन बनसोडे, प्रताप बनसोडे, गोविंद मुळे, बिभिषण मुंडे, गणेश मुंडे, बिभीषण गित्ते, श्रीकृष्ण मुंडे, विनायक मुंडे, महादेव मुंडे (चेअरमन), महादेव मुंडे, प्रदिप गित्ते, मोहन गित्ते, नवनाथ खेत्रे, अशोक पांचाळ, बाबुराव मुंडे,आदि शेतकरी उपस्थित होते. 

No comments