Breaking News

कोरोनाबाधीत रूग्णांची गृह विलगीकरणाची आणखी मुदत वाढवावी आ.सुरेश धस यांची आरोग्य विभागाकडे पञाद्वारे मागणी

के. के. निकाळजे । आष्टी 

दिवसेंदिवस शहरी भागात कमी आणि ग्रामिण भागात कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच चालली आहे.आत्ता पर्यंत आरोग्य विभागाच्या नियमाप्रमाणे कोरोनाबाधीत रूग्णांना दहा दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे.परंतु रूग्ण घरी गेल्यानंतर त्याला पुन्हा ञास होत असल्याने आरोग्य विभागाने विलगीकरण दहा ऐवजी सतरा दिवस करावे अशी मागणी आ.सुरेश धस यांनी राज्याचे आरोग्य संचालक डाॅ.रामास्वामी यांच्याकडे पञाद्वारे केली आहे.

                 आमदार सुरेश धस यांनी दिलेल्या पञात म्हटले की,बीड जिल्ह्यामध्ये कोव्हीड १९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे संक्रमित रुग्णासाठी गृृृृह विलगीकरणसाठी दहा दिवसांची मुदत दिलेली आहे. तथापि ग्रामीण भागात आम्ही केलेल्या पाहणीमध्ये असे आढळून येत आले की,ग्रामीण भागातील रुग्णांची परिस्थिती पाहता गृह विलगीकरणा मध्ये दहा दिवस राहिलेल्या रुग्णांना पुन्हा एकदा शारीरिक त्रास होत असून,त्याचा संसर्ग होऊन पुन्हा अधिक बळावत असेल वीस पर्यंत स्कोर वाढत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे.

त्यानुसार संक्रमित रुग्णाच्या गृृृृह विलगीकरणाची मुदत आणखी किमान सात दिवस वाढवण्याची आवश्यकता आहे.त्यानुसार संक्रमित रुग्णांची गृृृृह आणि मुदत वाढवावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशी मागणीही दिलेल्या पञाद्वारे केली आहे.

No comments