Breaking News

बीडमध्ये कोरोना बाधित रुग्णाची आत्महत्या

आशिष सवाई । बीड 

शहरातील बार्शी रोडलगत असलेल्या दीप हॉस्पिटलमध्ये एका कोरोना बाधित रुग्णावर उपचार करण्यात येत होते. मात्र त्या रुग्णाने हॉस्पिटलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे समोर आलीय. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार रामलिंग सानप (रा. तांदळ्याचीवाडी) हे कोरोना बाधित असल्याने त्यांच्यावर बीड शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ दिवसांपासून उपचार केले जात होते. शुक्रवारी (दि.२१) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या रुग्णाने हॉस्पिटलच्या चॅनेल गेटला स्वतः जवळील रुमालाने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

No comments