Breaking News

"जिद्द चिकाटी आणि कामातील प्रामाणिकपणा ठेवल्यास मानसिक समाधान प्राप्त होते" : भास्कर सावंत

 


उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांना निरोप

गौतम बचुटे । केज 

प्रत्येकाने आपले काम करीत असतानान जिद्द, चिकाटी आणि सचोटीने काम करून सामान्य माणसाला मदत केली. तर ते मिळणारे समाधान हे पैशापेक्षा सर्वात मोठे असते. त्यातून माणसाला निश्चित मानसिक समाधान मिळते. तीच खरी कामाची पावती असल्याचे मत उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत यांनी आपल्या निरोप समारंभाच्या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना केले.

केज उपविभागाचे पोलीस अधिकारी भास्कर सावंत हे त्यांच्या निहित वयोमाना नुसार दि ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्त अंबाजोगाई विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या अध्यक्षतेखाली निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी भास्कर सावंत आणि सौ सावंत यांचा कर्मचाऱ्यांनी सपत्नीक सत्कार केला. या प्रसंगी बोलताना भास्कर सावंत म्हणाले की, पोलीस दलात काम करीत असताना वर्दीची ताकद आणि सन्मान प्रत्येकाने जपला पाहिजे. जिद्द आणि चिकाटी हे प्रत्येकांच्या अंगी असणे आवश्यक असून आपण सामान्य माणसासाठी प्रामाणिक पणे काम केले तर त्यातून मिळणारे समाधान हे खुप महत्त्वाचे असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्यांना पोलीस सेवेची आवड असल्या असल्यामुळे प्राध्यापक आणि वनअधिकारी या दोन नौकऱ्या सोडून पोलीस दलात रुजू झाल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. 

प्रमुख पाहुण्या आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी भास्कर सावंत यांच्या वक्तशीरपणा, काम करण्याची पद्दत आणि कर्मचाऱ्यांवर न रागावता काम करून घेण्याची शैली व तपासातील अनुभव यांना उजाळा दिला. यावेळी बोलताना अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी सावंत साहेब यांच्या सोबत काम करीत असताना आलेले अनुभय कथन केले.

निरोप समारंभा प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, श्रीमती सुरेखा धस, संतोष मिसळे, संदीप दहिफळे, विजय आटोळे, केंद्रे, पालवे, दादासाहेब सिद्धे, श्रीराम काळे, प्रदीप डोलारे, वाचक माने साहेब यांच्यासह केज, धारूर, नेकनूर आणि युसुफवडगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माने यांनी तर आभार प्रदर्शन दादासाहेब सिद्धे यांनी व्यक्त केले

अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक सावंत यांनी निरोप देताना त्यांची गाडी कार्यालयाच्या बाहेर ओढत नेली त्या प्रसंगी सर्वजण भावुक झाले.


No comments