Breaking News

लॉक डाऊन काळामध्ये खाजगी फायनान्स, सहकरीबँक, सरकारी बँकांचे वसुलीवर बंद करावी -सुरेखा जाधव

बीड :  लॉक डाऊन काळामध्ये हाताला काम नाही.त्यामुळे कोणत्याही बँकेचे, फायनान्स,सावकार यांचे कर्ज परतफेड करू न शकल्याने त्यांना दंड लाऊन,सिव्हील खराब करून ही वसुलीचा तगादा लावला आहे.तो तात्काळ थाबवावा अशी मागणी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेखा जाधव यांनी केली आहे. गेल्या मार्चपासून पूर्ण मे महिना सुद्धा  लॉक डाऊन होण्याची शक्यता आहे . असे असताना मार्च, एप्रिल आणि मे सलग तीन महिने सर्वसामान्यांचे कामबंद असून रोजगार बंद असल्याने बँकेचे ,खाजगी फायनान्स आणि सावकाराचे कर्ज कसे परतफेड करावे. या चिंतेत सध्या जनता आहे. 

यामुळे मा. जिल्हाधिकारी साहेबांनी खाजगी फायनान्स कंपनी, राष्ट्रीयीकृत बँका, पत्संस्था ,सर्व वित्तीय संस्था आणि सावकार यांना स्पष्ट ताकीद द्यावी की, पुढील दोन महिने कसल्याही प्रकारची वसुली कोणीही करू नये ,आणि मार्च ,एप्रिल, मे आणि जून ला जरी पुन्हा लॉक डाऊन वाढण्याची शक्यता वाटली किंवा लॉक डाऊन पडला तर पुढील महिने पूर्णतः   वसुली बंद करावी , मार्च-एप्रिल मध्ये कोणाच्या हप्ते बोन्स झाली असल्यास त्यावर लागणारा  दंड तो दंड रद्द करण्यात यावा .आणि सिव्हील ही कोणाचं खराब होणार नाही. 

याची बीड जिल्हाधिकारी यांनी,खबरदारी,घ्यावी.मार्च ,एप्रिल, मे महिन्यामध्ये याची जबाबदारी शासनाने  सुद्धा घ्यावी  . कारण हातावर पोट असणार्‍या आणि गरीब जनतेला रोजगार उपलब्ध नसल्याने आर्थिक अडचणीत आहेत. त्यातली त्यात पुन्हा ते  फायनान्स कंपनीचे हप्ते असतील ते परत करण्यास असमर्थ   झाली असल्याने यावेळेस यादरम्यान त्यावर लागणारा दंड आणि त्यांचे होणारे सिव्हिल खराब होऊ नये. यासाठी मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी स्पष्ट आदेश त्यांना द्यावेत आणि वसुली तात्काळ थांबवावी. ही नम्र विनंती.  दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सामाजिक कार्यकर्ते सुरेखा जाधव यांनी  मागणी केली आहे. 

No comments