Breaking News

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत माय- लेकीचा होरपळून मृत्यू माजलगाव तालुक्यातील कट्टीआडगाव येथील दुर्देवी घटना


माजलगाव : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत माय- लेकीचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना माजलगाव तालुक्यातील कट्टीआ डगावमध्ये रविवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच माजलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्देवी घटनेने गावावर शोककळा पसरलीय. 

मिळालेल्या माहितीनुसार माजलगाव तालुक्यातील कट्टी अडगावात शशिकला शंकरराव फफाळ (वय६५) व सखुबाई शंकरराव फफाळ (वय४५) या मायलेकी घरात झोपल्या होत्या. अचानक शॉर्टसर्किट झाल्याने घराला आग लागली. आगीत शशिकला फफाळ व त्यांची मुलगी सखुबाई यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक पुंडगे, उपनिरीक्षक इधाटे, पोलिस कर्मचारी राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पंचनामा करण्यात येत असून अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत.


No comments