Breaking News

राहुल भानुदासराव कांबळे यांचे दु:खद निधन


बीड
: शहरातील माळीवेस येथील सर्व परीचित व्यक्तीमत्व असलेले राहुल भानुदासराव कांबळे (वय ४०) यांचे औरंगाबाद येथील अपेक्स रुग्णालयात उपचारा दरम्यान रविवारी (दि.२) दु:खद निधन झाले. 

चार वर्षांपासून राहुल कांबळे गंभीर आजाराने त्रस्त होते. ३० एप्रिल २०२१ रोजी  अचानकपणे त्यांचे दुखू लागल्याने उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथील अपेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर जुना मोंढा येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक भाऊ एक बहीण असा मोठा परिवार आहे. राहुल कांबळे यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा खूप मोठा मित्र परिवार असून त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे माळीवेस मध्येचं नाही तर ते बीड शहरात परीचित होते. त्यांच्या अकाली निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. कांबळे परिवाराच्या दु: खात दृष्टीकोन न्यूज परिवार सहभागी आहे. 

No comments