Breaking News

बोगस बी-बियाणे विक्रीला प्रतिबंध घाला : राजेंद्र आमटे

शिवसंग्राम शेतकऱ्यांची फसवणूक खपून घेणार नाही 

बीड :  शेतकरी आपल्या शेतात नांगरणी,पेरणी, कोळपणी,खुरपणी अशी खूप मेहनत करतो खते,बी-बियाणे साठी व्याजाने  पैसे काढून खर्च करतो आत्ता पेरणीचे दिवस जवळ येत असताना शेतकरी खते ,बी-बियाणे खरेदी करण्याच्या तयारीत आहेत परंतु बीड जिल्ह्यात अनेक बोगस बी-बियाणे बनवणारे रॅकेट सक्रिय झालेले असून अनेक दळभद्री नराधम थोड्या पैशासाठी अनेक नमकीत कंपन्यांचे पाकिटे छापून त्यात बनावट बियांने पॅकिंग करून कृषी दुकानदारांना विक्री करतात थोड्याशा पैसे साठी शेतकऱ्याचे आयुष्य देशोधडीला लागत आहे.अनेक शेतकऱ्यांनी बोगस बियानामुळे आत्महत्या करण्याची वेळ या पूर्वी अली होती.

    प्रशासनाने तात्काळ बोगस बियाणे प्रतिबंधात्मक समितीची स्थापना करून बोगस बियाणांचा प्रतिबंध करावा असे निवेदन मा. आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या वतीने देण्यात आले या विकी तात्काळ बोगस बियाणे विक्री करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी शिवसंग्राम शेतकरी आघाडी शेतकऱ्यांनची फसवणूक खपून घेणार नाही असा इशारा शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर कोकाटे,शिवसंग्राम शेतकरी आघाडी कायदेसल्लागारअँड.शरद तिपाले, शेतकरी नेते विलास मस्के,युवा नेते विजय सुपेकर आदींच्या वतीने देण्यात येत आहे.


No comments