Breaking News

आष्टी येथील वसुंधरा माध्यमिक विद्यालयाच्या वतीने कोव्हिड सेंटरला दहा क्विंटल गहू भेट

आष्टी :  येथील वसुंधरा माध्यमिक विद्यालय यांचाकडुन पारगाव घुमरा येथील आ.सुरेश (आण्णा) धस  मित्रमंडळ व मच्छिन्द्रनाथ देवस्थान मार्फत अंतर्गत चालु असलेल्या  कोवीड सेंटरला १० क्विंटल शेत गहु प्रदान करण्यात आला. जगामध्ये आलेल्या कोव्हिड या महामारीच्या संकटाला आज सर्व देशात सामना करावा लागत आहे.

 

यामध्ये शहरी भाग व ग्रामीण भागातील जनतेला सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव होतोय. या संकटातून गोरगरीब,दिन दुबळे,शेतकरी,अर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला संकटात बळ व धैर्य देऊन मदत करण्यासाठी बीड जिल्ह्यातील जननायक,लोकनेते संकटमोचक ,आ. सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी, पाटोदा,शिरूर या तालुक्यात सुरेश धस मित्र मंडळ व मच्छिंद्रनाथ  देवस्थान सावरगाव मायंबा अंतर्गत विविध ठिकाणी कोव्हिड सेंटर चालू केलेले आहेत. 

संकटकाळात समाजाला मदत म्हणून एक सामाजिक बांधिलकी जोपासून आपले आद्यकर्तव्य समजून वसुंधरा माध्यमिक विद्यालय आष्टीचे संस्थापक अध्यक्ष मनोरंजन धस यांच्या मार्फत पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा येथे चालू असल्येल्या कोव्हिड सेंटरला दहा क्विंटल गहू प्रदान करण्यात आले. याप्रसंगी विस्तार अधिकारी गव्हाणे, मळेकर सर, ढेरे सर, बेदरे सर, घुमरे सर, समाजसेवक सुरेंद्र (बाबा) तिपटे व कोवीड सेंटर सुंदरपणे चालवत आसलेले सरपंच पती पदमाकर घुमरे, व आरोग्य कर्मचारी कर्मचारी,पोलीस कर्मचारी.या सत्कार्या व सत्कर्माबद्दल जेष्ट शिक्षण विस्तार अधिकारी मनोरंजन धस यांचे  आ. सुरेश धस, देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांच्या सह विविध मान्यवरांच्या कडून अभिनंदन करण्यात आले. 

No comments