Breaking News

तेलगावात ७० हजाराची विदेशी दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

दिंद्रुड : दिंद्रुड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तेलगाव परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अंबाजोगाई येथील पथक मंगळवारी (दि.४) गस्तीवर असताना याठिकाणी  विदेशी दारूचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याचे पथकाला माहिती मिळाली. दरम्यान रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत एकजण अवैधरित्यादारूची विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून तब्बल 70 हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार सध्या कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले असून अवैध मद्याची विक्री होऊ नये, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहे. ४ मे रोजी अंबाजोगाईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दिंद्रुड पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना तेलगाव ता. धारूर येथे रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत इसम नामे दामोदर माणिक चव्हाण, वय 21 वर्षे, रा. तेलगाव, तालुका धारूर हा विदेशी मद्याचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याचे आढळून आले. त्याच्या ताब्यातून राज्य उत्पादन शुल्क विभागाने इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की च्या १८९ मिलीच्या २४० बाटल्या व मॅक डॉवेल नंबर वन व्हिस्की च्या १८९ मिली क्षमतेच्या २४९ बाटल्या असा एकूण ६९ हजार ६९० रुपयाचा विदेशी मद्याचा साठा हस्तगत केला. तसेच त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा,१९४९ चे कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर कारवाई परिविक्षाधीन उप अधीक्षक श्री इंगळे, दुय्यम निरीक्षक अंबाजोगाई श्री आल्हाट, जवान धस व पाटील व जवान-नि-वाहन चालक डुकरे यांनी केली.

No comments