Breaking News

माजी प्राचार्य कै.प्रमोदकुमार कोहणे यांच्या स्मरणार्थ आष्टी ग्रामीण रुग्णालयासाठी ऑक्सिजन वाहक ट्रॉल्य भेट

आष्टी : आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा हिंदी विभाग प्रमुख कै.प्रमोदकुमार शंकरराव कोहणे यांच्या स्मरणार्थ आष्टी ग्रामीण रुग्णालय तथा ट्रॉमा केअर सेंटर,कोव्हिड रुग्णासाठीच्या ऑक्सीजन वाहक ट्रॉल्या माजी प्राचार्य कै.प्रमोदकुमार कोहणे यांच्या पत्नी श्रीमती कोहणे, चिरंजीव प्रसाद आणि कन्या भारती त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राहुल टेकाडे त्यांच्याकडे भेट दिल्या.

त्याकरिता रुपये 7000 चा चेक त्यांच्या स्मरणार्थ दिनांक 18 मे 20 रोजी सुपूर्त केला.याप्रसंगी कवी प्रा.सय्यद अलाऊद्दीन, परिसेविका बी. शेख, डॉ. प्रताप मार्कंडे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत          खंडागळे, अधिपरिचारिका, कर्मचारी आदी उपस्थित होते. 

No comments