Breaking News

आ.विनायकराव मेटे यांच्या कोविड केअर सेंटर उभारणी मागील ध्येय साध्य - आज चार रुग्णांची कोरोनावर मात

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा शिवसंग्रामचे पदाधिकारी व कोविड केअर प्रशासनाकडून सत्कार..!

बीड  : आ. विनायकरावजी मेटे  यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठाण, बीड संचलित जिजाऊ कोविड केअर सेंटर, जिजाऊ माँसाहेब पब्लिक स्कूल, वासनवाडी फाटा, ता. जि. बीड येथे आज शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे यांनी भेट दिली, रुग्णांच्या आरोग्याबाबत प्रत्येक वार्डात जाऊन अस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांना धिर दिला. तसेच रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवणेबाबत व रुग्णांची विशेष काळजी घेण्याबाबत रुग्णालय प्रशासनास सुचना दिल्या.  

तसेच आज कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठाण, बीड संचलित जिजाऊ कोविड केअर सेंटर, जिजाऊ माँसाहेब पब्लिक स्कूल, वासनवाडी फाटा, ता.जि.बीड येथील आज चार रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे शिवसंग्राम पदाधिकारी व कोविड केअर प्रशासनाकडून त्यांचा यथोचित सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता.

कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेल्या चार रुग्णांचा शाल, पुष्पगुच्छ व जिजाऊ मॉसाहेब, छ.शिवरायांची प्रतिमा भेट देवून सत्कार करण्यात आला व पुढील निरोगी  आरोग्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे, विनोद कवडे, शेषेराव तांबे, गजानन थोरात, सुनिल धायजे सह वैद्यकीय स्टाफ मधील डॉ.सय्यद रियाज, डॉ.ज्योती काकडे, सपना धन्वे, सोनाली सवई, पंकज खंडेलवाल, कृष्णा बहिरवाळ आदी. उपस्थित होते.

शेवटी कोरोनावर मात केलेल्या रुग्णाने प्रतिक्रिया देताना आ.विनायकराव मेटे साहेबांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून या कोविड केअर सेंटरमध्ये घरच्या पेक्षाही चांगले जेवण व इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या, विशेष काळजी घेतली  त्याबद्दल साहेबांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच असून, ते शब्दात व्यक्त करणे शक्य नसल्याचे सांगितले. 

No comments