Breaking News

शिरुर कासार शहरात विना मास्क फिरणार्‍या १२ जणांवर तर नियमांचे उल्लंघन करणार्‍या १७ दुकानांवर कारवाई!


सहा दुकाने केली सील ; मुख्याधिकारी किशोर सानप यांची दबंग कारवाई

शिरूर कासार : शहरात विना मास्क फिरणाऱ्या जणांवर तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एकूण १७ दुकानांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल २८,६०० रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. ही कारवाई नगरपंचतीचे मुख्याधिकारी किशोर सानप यांच्यासह कर्मचाऱ्यांनी दि. २९ ३० एप्रिल रोजी केली. तसेच नियमांचे उल्लंघन करणारे  ६ दुकाने सिल करण्यात आल्याचे नगरपंचायतीकडून सांगण्यात आले आहे. 

आजपर्यंत शिरुरकासार नगरपंचायतीमार्फत विनामास्क फिरणार्‍या एकुण ४३६ लोकांवर कारवाई करुन १,५६,००० रु चा दंड तर नियमांचे उल्लंघन करणार्‍या एकुण ५७ दुकानांवर कारवाई करुन ७६,०००रु चा दंड असा एकुण २,३२,०००रु चा दंड वसुल करण्यात आला आहे. तरी शिरुरकासार शहरातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,विनाकारण बाहेर फिरु नये , संचारबंदी असल्याने अत्यावश्यक कारण असेल तरचं सकाळी ७ ते ११ या वेळेत घराबाहेर पडावे. आणि, घराबाहेर पडताना तोंडावर मास्क घालणे बंधनकारक आहे. 

नागरिकांनी खालील पुढील नियमांचे करावं पालन

१) मुखपट्टी / मास्कचा वापर सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी त्याच प्रमाणे सार्वजनिक व खाजगी वाहनातून प्रवास करताना मुखपट्टी/ मास्क वापरणे बंधनकारक आहे.

२) सामाजिक अंतर राखणे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन व्यक्तीमध्ये किमान 6 फूटाचे अंतर राखणे बंधनकारक आहे. तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घेणे बंधनकारक आहे आणि अशा आस्थापनांमध्ये एका वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक / व्यक्ती असणार नाहीत.

३) सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास प्रतिबंध-

सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये.सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्ती विरुद्ध दंडाची आकारणी करणेत येत आहे.

४) सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, गुटखा, तंबाखू, सुपारी इ. खाण्यास / पिण्यास प्रतिबंध आहे.

५)अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांमध्ये येणारे कर्मचारी / ग्राहक यांच्येसाठी शरीराचे तापमान तपासणे, हात धूणे आणि सॅनिटायझरची सुविधा पुरवून सर्व येण्या आणि जाण्याच्या दारांमध्ये (प्रवेश व बहिर्गमन ) आणि सामुदायीक जागांच्या ठिकाणी या उपाययोजना ठेवाव्यात.

६) कामाची जागा, सामुदाईक वापराची ठिकाणी त्याच प्रमाणे व्यक्तींचा एकमेकांशी संपर्क येईल अशी ठिकाणे वारंवार निर्जंतुक करणेत यावीत.

७)खाजगी/शासकिय बँकविषयक आस्थापनांमधील व्यवस्थापनाने तिथे काम करणाऱ्या कामगारांमध्ये सामाजिक अंतर राखले जाईल. दोन कामाच्या पाळ्यांमध्ये अंतर असेल व कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळा भिन्न-भिन्न असतील याची दक्षता घ्यावी. सर्व शासन नियमांचे पालन करुन नगरपंचायत प्रशासनास सहकार्य करावे जे लोक कोविड19 ची नियमावली मोडतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही नगरपंचायतीमार्फत देण्यात येत आहे.

या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार किशोर सानप यांनी केले आहे. ही कारवाई करते वेळी मुख्याधिकारी यांच्या समवेत नगरपंचायतचे लेखापाल चंद्रकांत दामोदर कर्मचारी नामदेव घुगे, संजय गायकवाड, सुनील शेटे, लक्ष्मण थोरात, कौस्तुब शेख, दीपक गवळी, बाळू तगर, भाऊसाहेब मोरे, प्राणाकुर दगडे, अक्षय सुरवसे, शहादेव गायकवाड व इतर उपस्थित होते. 

No comments