Breaking News

आमदार धसांच्या निवेदनाचा "जोर का झटका" सार्वजनिक बांधकाम विभागाला बसला!

बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार

तालुक्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाची कामे राखडल्याने कोविड रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित शासकीय यंत्रणा आणि गुत्तेदार यांचे विरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्या बाबत उस्मानाबाद- लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार सुरेश धस यांनी शिरुर कासारचे तहसीलदार श्रीराम बेंडे यांना पत्र दिले होते. त्यामुळे संबंधीत यंत्रणेत खळबळ उडाली असून गुन्हे कधी दाखल होतात या कडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते.

आमदार सुरेश धस यांनी कोरोना महामारीचा संदर्भाने (दि.१० ) रोजी बैठक घेऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली होती. याच बैठकीत रस्त्याच्या रखडलेल्या कामा मुळे रुग्णांचे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे संबंधित यंत्रणा आणि गुत्तेदार यांच्या विरुद्ध पोलिसात दुसऱ्याच दिवशी सकाळी गुन्हा दाखल करण्याची सूचना आमदार धस यांनी तहसीलदार बेंडे यांना दिली होती.मात्र,   गुन्हे दाखल न झाल्याने दुपार नंतर आमदार धस यांनी तहसीलदारांना गुन्हे दाखल करण्याबाबत लेखी पत्र (दि.११) रोजी दिले होते.

तसेच शिरूर तालुका हद्दीतील चिंचपुर ते नवगण राजुरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसापासुन बंद आहे. रखडलेल्या अवस्थेत आहे. याच रस्त्यावरून ऑक्सिजन पुरवठा करणारी वाहने, रुग्णवाहिका,औषधी पुरवठा करणारी वाहने आणि रुग्णाचे नातेवाईक याच्या वाहनांना प्रवासासाठी अडथळे येत आहेत. यामुळे अनेक रुग्णांनी जीव गमवावा लागला आहे . तसेच जाटनांदूर - हंगेवाडी -  गोमळवाडा ते शिरूर या रस्ता कामाचा कार्यारंभ आदेश १६ महिन्यापुर्वी देण्यात आलेला असुनही हे काम रखडलेलेच आहे.  या रस्त्यावर मोठे मोठे खडे पडलेले असल्यामुळे वाहतुकीसाठी प्रचड अडचणी येत आहेत. पावसाळा हंगाम येऊ लागला आहे.त्यापूवी ही कामे पूर्ण होणे आवश्यक होते .

परंतु बीड जिल्ह्यातील जनता सोशिक आहे. या सोशिक जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहण्यात आलेला आहे. असेही आ.धस यांनी म्हटले आहे. याचाच धसका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने आज रोजी सिंदफणा ते शिरूर या कामाला सुरुवात झाली आहे. बैठकीच्या वेळी नायब तहसीलदार खेडकर साहेब, गटविकास अधिकारी उद्धव सानप ,कृष्णा पानसंबळ,विजय सरवदे,कल्याण तांबे सुरेश उगलमूगले,आप्पासाहेब येवले(स्वीय सहाय्यक) बबन मोरे , अशोक मोरे  यांची उपस्थिती होती.


No comments