Breaking News

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे भान ठेवून काम करावे आमदार बाळासाहेब आजबे

आष्टी : सध्या सर्वत्रच कोरोणाची भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून या परिस्थितीचे भान अधिकारी व कर्मचारी यांनी ठेवले पाहिजे आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून ज्या ठिकाणी काम करतो ते काम जबाबदारीने पूर्ण करण्याची ही वेळ असून कोणीही आपल्या कामात हलगर्जीपणा करू नये आपल्या हलगर्जीपणामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो त्यामुळे covid-19 परिस्थिती लक्षात घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे अशा सूचना आमदार बाळासाहेब आजबे यांनी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे झालेल्या बैठकीत दिल्या.  


      ग्रामीण आरोग्य रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर। आष्टी या ठिकाणी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची बैठक आमदार बाळासाहेब आजबे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी  बीड जिपचे माजी अध्यक्ष शिवाजी राऊत  ज्येष्ठ नेते काकासाहेब शिंदे  कर्तव्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष  संदीप सुबरे , सरपंच अशोक पोकळे नाजिम शेख   तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन मोरे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राहुल टेकाळे यांच्यासह सर्व डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी तालुक्यातील आरोग्य व कोरोना बाबतचा एकूण आढावा घेत कर्मचार्‍यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या, covid-19 चा सामना करत असताना आरोग्यासाठी ज्या सुविधा लागतील त्या सर्व सुविधा देण्यास मी समर्थ आहे कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली जाणार नाही सर्व सुविधा बरोबरच अधिकारी व कर्मचारी यांचे योगदानही महत्त्वाचे आहे काही एक, दोन अधिकाऱ्यांमुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेत विस्कळीत पणा जाणवत आहे ,अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 

 त्याबाबत चौकशी करण्यात येईल , लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे अधिकारी व कर्मचारी त्यांच्यातही ताळमेळ राहणे गरजेचे आहे आजची परिस्थिती ही जबाबदारी झटकण्याची नसून स्वतःची जबाबदारी स्वतः व्यवस्थित पार पाडण्याची वेळ आहे त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने काम करावे ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या सोडवण्यासाठी मी आमदार म्हणून आपल्या पाठीशी खंबीर उभा आहे आज पर्यंत मतदार संघातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे यापुढेही असेच काम करावे अशी अपेक्षा यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी व्यक्त केली.

 आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळाच्या वतीने आष्टी येथीलकोविड सेंटरमध्ये मोफत  पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे ,आमदार बाळासाहेब आजबे यांनी कोविड सेंटरमधील रुग्णांची विचारपूस करत या ठिकाणी मिळत असलेल्या सुविधांबाबत विचारपूस करून रुग्णांना धीर दिला.

No comments