Breaking News

केजमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावर कोरोना तपासणी : दोन दिवसात १८८ जणांची टेस्ट, ८ पॉझिटीव्ह

गौतम बचुटे । केज 

केज येथे दुसऱ्या दिवशी धारूर चौकात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या.

आज दि.२ मे रोजी केज येथील जय भवानी चौकात विनाकारण वाढणारी गर्दी यावर नियंत्रण घालण्यासाठी तहसीलदार डी. सी. मेंडके यांनी आता एक अभिनव उपक्रम राबविला आहे. त्यांच्या सोबत उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, नायब तहसीलदार लक्ष्मण धस, सचिन देशपांडे, पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, दिलीप गीते, राजू गुंजाळ, जिवन करवंदे, नगर पंचायतचे कार्यालयीन अधीक्षक होटे, सेनेचे तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, श्रीकृष्ण नागरगोजे, आदर्श पत्रकार संघाचे सचिव गौतम बचुटे हे उपस्थित होते. 

पोलीस आणि आरोग्य विभाग व स्थानिक नगर पंचायतीच्या मदतीने केज येथील जय भवानी चौकात अडवून त्यांची थेट रॅपिड अँटिजेन टेस्ट करायला सुरुवात केली. आज एकूण १२२ जणांची टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ जण पॉझिटिव्ह आढळले. पॉझिटिव्ह आढळलेल्यांची रवानगी थेट कोरोना केअर सेंटरमध्ये आणि योगायोगाने निगेटिव्ह आढळला तर साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करून स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी दंडात्मक कार्यवाही सुरू आहे. तसेच या अँटिजेन टेस्ट करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना तपासणी केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ किरण साखरे, डेटा ऑपरेटर सचिन शिंदे, राहुल पटेकर यांनी तपासणी केली. 

No comments