Breaking News

युवा नेते अभयराजे धोंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोविड केंद्रामध्ये मास्क, हॅन्डग्लोज आणि फळे वाटप

आष्टी : आष्टी तालुक्यातील सालेवडगाव येथील रामतीर्थ आरोग्य मंदिरात (कोविड केंद्र) अनेक अन्नदाते पुढे येत असतानाच आष्टी-पाटोदा-शिरूर मतदार संघाचे मा.आ.भीमसेन धोंडे यांचे सुपुत्र युवा नेते अभयराजे धोंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सालेवडगाव येथील प्रा.अनिल हजारे यांच्या वतीने कोरोना बाधित रुग्णांना मास्क, हॅन्डग्लोज आणि फळे वाटप करण्यात आले. तर कोविड केंद्राला विक्रम पठारे यांच्या वतीने ११११/- रुपये मदत देण्यात आली.

       युवा नेते अभयराजे धोंडे यांचा आज वाढदिवस असून, आज दिवसभर विविध कोविड केंद्रामध्ये फळे वाटप करण्यात आली आणि त्याचेच औचित्य साधून गावातीलच संवेदनशील असलेले नागरिक प्रा.अनिल हजारे यांनी कोरोना संकट काळात आपणही काहीतरी समाजाकामी यावं म्हणून आज विविध उपक्रम राबवत त्यांनी आपल्या लाडक्या युवा नेत्याचा वाढदिवस सार्थ ठरवला. तसेच विक्रम पठारे यांनी देखील आपल्या युवा नेत्याच्या वाढदिवसानिमित्त सालेवडगाव येथील कोविड केंद्राला ११११/- रुपये मदत म्हणून दिले आहेत.

       प्रा.अनिल हजारे हे आपले नेतृत्व मा.आ.भीमसेन धोंडे यांचा आदर्श समोर ठेऊन संकट काळात नेहमीच समाजाला आधार देण्याचे काम करत असतात. आजच्या या सामाजिक कार्याबद्दल रुग्ण, नातेवाईक व ग्रामस्थांनी प्रा.अनिल हजारे व विक्रम पठारे यांचे विशेष कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.


No comments