Breaking News

पोलीस स्टेशन आवारात भांडण करणे महागात पडले : पोलिसांनी केले दोन्ही गटा विरुद्ध गुन्हे दाखल

गौतम बचुटे । केज   

पोलीस स्टेशनच्या आवारात दोन गटात झालेल्या मारामारी प्रकरणी पोलीसांनी दोन्ही गटा विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. ९ मे रोजी दुपारी ३:०० वा च्या दरम्यान अकबर शेख आणि भाऊसाहेब चाळक यांच्या गटात शेतातील नाली खोदन्याच्या कारणा वरून उमरी पाटीवर शेतात तुंबळ हाणामारी झाली होती. त्या नंतर सायंकाळी ५:०० वा च्या दरम्यान ते दोन्ही गट केज पोलीस स्टेशनला हजर झाले त्यातील जखमी व्यक्तींना उपचारासाठी पत्र देऊन दवाखान्यात पाठवीत असताना सय्यद अकबर नबीसाब, सय्यद मोबीन अकबर, सय्यद मोईन अकबर आणि भाऊसाहेब रामराव चाळक, मकरध्वज भाऊसाहेब चाळक, श्रीनिवास भाऊसाहेब चाळक यांनी पोलीस स्टेशनच्या प्रांगणात व पोलिसांच्या समोर आपसांत मारामारी करून झुंज खेळले. सदर भांडण सुरू असताना पोलीस स्टेशन मध्ये हजर असलेले सहाय्यक फौजदार सेंगर, सचिन आरडवाड, भास्कर शिरसट आणि अशोक नामदास यांनी सोडवा-सोडवी केली.

या प्रकरणी पोलीस नाईक अशोक नामदास यांच्या फिर्यादी वरून सय्यद अकबर नबीसाब, सय्यद मोबीन अकबर, सय्यद मोईन अकबर आणि भाऊसाहेब रामराव चाळक, मकरध्वज भाऊसाहेब चाळक, श्रीनिवास भाऊसाहेब चाळक या सहा जणांच्या विरुद्ध गु. र. नं. २३१/२०२१ भा. दं. वि. १६० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत. 

No comments