Breaking News

आष्टी येथील प्रसिद्ध उद्योजक अशोक चौधरी यांच्याकडून नवजीवन बालगृहातील मुलांसाठी किराणा व अन्नधान्याची मदत


 के. के. निकाळजे । आष्टी

तालुक्यात माऊली सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, शेती विषयक उपक्रमाबरोबरच संस्थेच्या माध्यमातून नव्याने सुरू केलेल्या भटके विमुक्त, आदिवासी, ऊस तोड मजूर, वीट भट्टी कामगार, वंचित व दुर्लक्षित घटकातील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरू केलेल्या नवजीवन बालगृहातील मुलांना किराणा सामानाची व गहू,तांदूळ यांची मदत  मा.अशोक दादा चौधरी यांच्याकडून करण्यात आली. 

    यावेळी संस्थाध्यक्ष विकास म्हस्के यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत जागतिक पातळीवर कोरोना या भयानक महामारीने हाहाकार घातला असल्याने संस्थेची आर्थिक अडचणी येत असल्याचे सांगत संस्थेने नव्याने सुरू केलेल्या नवजीवन बालगृहातील गोरगरीब मुलांच्या उपजीविकेसाठी अन्न, धान्याची,व किराणा याची गरज असल्याने आष्टी येथील युवा उद्योजक मा.श्री.अशोक दादा चौधरी यांनी एका आठवड्याचा किराणा व एक कट्टा गहू आणि एक कट्टा तांदूळ याची मदत केली. उद्योजक मा. श्री. अशोक दादा चौधरी यांनी दिलेल्या मदतीबद्दल माऊली सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मेजर विकास म्हस्के यांनी आभार मानले. यावेळी मा.प्रशांत चौधरी व प्रमोद चौधरी उपस्थित होते. 

No comments