Breaking News

कायाकल्प फाऊंडेशनच्या वतीने वनपरिमंडल अधिकारी शंकर वरवडे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार


किल्ले धारुर
:  वनपरिमंडल अधिकारी शंकर वरवडे यांना राज्य शासनाच्या वन विभागाच्या वतीने दिला जाणारा"वन संरक्षण व गुन्हे अन्वेषण" या क्षेत्रात उत्कृष्ठ कामाबद्दल पुरस्कार या वर्षी चा घोषित झाला असून तो लवकरच देऊन त्याना गौरव करण्यात येणार आहे त्यांना हा सन्मान घोषित झालेल्या  बद्दल त्याचे  कायाकल्प फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आला.               

     महाराष्ट्रात किल्ले धारुर वनपरिक्षेत्र कार्यालय हे आय.एस.ओ.मानांकन असणारे पहिले कार्यालय आहे. किल्ले धारुर वनपरिक्षेत्र कार्यालयातील शंकर वरवडे यांनी वनपरिमंडल पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर कार्यालय व परिसर हा सुशोभित करण्यात आला आहे.त्यामुळे या विभागाचा चेहरा मोहरा बदला आहे. 

        वनपरिमंडल अधिकारी शंकर वरवडे यांनी या अगोदर सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने सुवर्णपदक देऊन त्याचा सन्मान करण्यात आले आहे त्यांनी आपल्या कामाची गती कायम ठेवत किल्लेधारूर वन विभागाचा पदभार स्वीकारले नंतर   वन संरक्षण व गुन्हे अन्वेषण" विशेष काम केले तसेच येणाऱ्या काळात  त्यानी नवीन वृक्षरोप सहित त्याच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून काम करणार आहेत त्यांनी वन विभागाच्या कार्यलय परिसरात 200 झाडे नियोजन करून ठेवले आहे येणाऱ्या पावसाळ्यात वृक्ष लागवड करणार आहेत.                       

  कायाकल्प फाऊंडेशन च्या वृक्ष लागवड व संवर्धन कामाचे कौतुक करत वैकुंठ भूमी मधील लावलेल्या  वृक्ष रोपण हे सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे आणि लोकांनी विशेषतः युवकांनी पुढे येऊन केवळ वृक्ष लागवड न करता संवर्धन काम केले पाहिजे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राहील असे म्हणत कायाकल्प सामाजिक संस्था खुप छान काम करत आहे असे म्हणाले. 

     यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिलजी महाजन, वसुंधरा मित्र मंडळचे अध्यक्ष रोहन हजारी, कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, सचिव विश्वानंद तोष्णिवाल, ज्ञानेश्वर शिंदे, अलंकार कामाजी, बालाजी सातभाई व जलदूत विजय शिनगारे यांनी त्यांचा सत्कार केला.


No comments