Breaking News

जितेंद्र आव्हाड युवा मंच चे जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे यांनी आष्टीतील पत्रकारांना किराणा किटचे वाटप

दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन पत्रकारांना मदत करावी : अतुल शिंदे

आष्टी  :  आज घडीला पत्रकार हा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आपल्या देशातला पत्रकार हा चौथा आधारस्तंभ मानला जातो वास्तविक पाहता पत्रकार हा समाजाचा आरसा आहे प्रत्येक गोष्टीची माहिती लोकांपर्यंत देत आहे. पत्रकार या लॉकडाऊन मध्ये जीवाची पर्वा न करता प्रत्येक बातमी लोकांच्या हितासाठी देत आहे. 

त्यांना कसलिही  आर्थिक मदत अथवा पगार नाही. त्यामुळे मी आज आष्टी तालुक्यातील पत्रकारांना किराणा व मास्क सिनिटायझर चे वाटप केले असे प्रतिपादन आष्टी येथिल शासकीय विश्रामग्रह येथे अतुल शिंदे यांनी  केले. यावेळी जितेंद्र आव्हाड युवामंच जिल्हाध्यक्ष अतुल शिंदे यांनी सर्व पत्रकारांना मास्क व सॅनिटायझर किराणा की चे वाटप केले. पुढे बोलताना अतुल शिंदे म्हणाले की आज घडीला पत्रकार हा आर्थिक संकटात सापडला असून दानशूर व्यक्तीने पुढे होऊन पत्रकारांना मदत केली पाहिजे.

 मी चार वर्षाचा असताना माझी आई मयत झाली त्यावेळी माझे संगोपन माझ्या घराच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी केले. मला त्याची जाणीव असल्यामुळे मी आतापर्यंत एक हजार लोकांना किरणा किट वाटप करून आज पत्रकारांना किराणा कीट व सॅनिटायझर वाटप केले.

                             अतुल शिंदे


No comments