Breaking News

जैविक इंधन व जैविक खत प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न


 परळी : अक्षय तृतीयेच्या  शुभ मुहूर्तावर दि 14 मे रोजी सकाळी नऊ वाजता  पदमनिरमल बायोफू यएल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी परळी  प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले. कार्य क्रमाचे  अध्यक्षस्थानी  या प्रकल्पाचे मुख्य  प्रवर्तक  सेवानिवृत आतिरिकत  मुख्य कार्यकारी अधिकारी मा. पदमाकर केंदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून  कृषी उत्पन्न बाजार समिती परळीचे सभापती मा. अँड.  गोविंदराव फड हे होते तया'च्या शुभ हस्ते जैविक  इंधन  व जैविक खत  निरमिती प्रकल्पाचे भूमिपूजन  पार पडले.

 

सदरिल प्रकल्पातून  दररोज 100 मे.टन सिएनजी,पिएनजी  गॅस  व 150 मे. टन जैविक खत निर्माण  होणार  व या प्रकल्पामुळे परळी  तालुक्यातील दिड ते दोन हजार  युवकांना  रोजगार  मिळणार  असून ,या प्रकल्पासाठी शेतकरी सभासदानी नेपियर गवताची लागवड  करावयाची असून शेतकरयांना प्रती टन एक हजार रुपये भाव दिला  जाणार  असून प्रती एकरी प्रती वर्षी  दिडशे ते दोनशे टन   उत्पादन  होणार होऊन  सरासरी दोन लाख रूपये उत्पन्न  होणार  असल्याची माहीती पदमाकर केंदे  यांनी  दिली. यामुळे  शेतकरीवर्गाने  नेपियर गवताची लागवड करावी  असे आवाहन  करून सदरील प्रकल्पामुळे  शेतकरीवर्गाची आर्थिक परिस्थिती  सुधारून त्याचे जिवनमान  सुधारणार  असल्याचे प्रतिपादन  सभापती   फड यानी केले  या प्रकल्पामुळे  गावातील  स्वछता व आरोग्य चांगले राहणार आहे. जैविक खतामुळे विषमुकत अन्न तयार होणार असून लोक कॅसर रोगमुकत होणार आहेत. 

या प्रकल्पामुळे  पर्यावरण समतोल राखला जाणार आहे.   परळी तालुका इंधनात स्वयंपूर्ण करणे, शंभर टक्के  शेती सेंद्रिय  पद्धतीने  करणे, ऊस तोड कामगारांचे स्थलांतर  थांबविणे,उच्चशिक्षणासाठी  आंतरराष्ट्रीय   दर्जाचे शिक्षणसंस्था उभारणे, विद्यार्थीयासाठी खेळ व कार्डांचा सुविधा  उपलब्ध करून देणे, डिजिटल  लायब्ररी स्थापन  करणे, विद्यार्थीयांसाठी  उच्चशिक्षणासाठी  शिषवृती देणे,mvp च्या  माध्यमातून  शेतकरयांचे प्रश्न सोडविणे, शेतकरयांचे मालाला किफायतशीर भाव उपलब्ध करून देणे, एकंदर परळी तालुका सुजलाम सुफलाम करणे हे व्हिजन समोर ठेऊन सर्व संचालक मंडळ  काम करणार  असल्याचे प्रतिपादन  संचालक  श्री सुनील घुले यांनी  केले. या कार्य क्रमासाठी संचालक मंडळाचे सदस्य,  एमव्हीपी चे सदस्य,  सरपंच, महिला बचत गटाच्या महिला  उपस्थित  होत्या.  शेवटी शिवाजी घुले  यांनी  उपस्थियांचे आभार  मानले व कार्य क्रमाची सांगता झाली. No comments