Breaking News

बीडच्या युनियन बँकेतील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

बीड : येथील युनियन बँक मधील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने बँक प्रशासनाकडून दोन दिवासांपासून बँकेचे कामकाज पुर्णतः बंद ठेवण्यात आले असून त्या बाबत सूचना बँकेच्या दर्शनी भागावर लावण्यात आली आहे. दरम्यान बँकेतील अन्य कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्यात आली असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. 

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होण्या ऐवजी त्यात आणखीच भर पडत आहे.जिल्हा प्रशासन वारंवार घरी राहण्याचं नागरिकांना आवाहन करीत आहेत. मात्र प्रशासनाच्या आवाहनाला न जुमानता काही महाभाग विनाकारण रस्त्यावर फिरतायेत. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे.

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक नजीक युनियन बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेतील एका बँक कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.  त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बँकचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आलेत. बँकेतील अन्य कर्मचारी यांची ही टेस्ट करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. तसेच गेल्या तीन चार दिवसांपूर्व बँकेत व्यवहार करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असून कोविड -१९ ची लक्षणे दिसून आल्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेण्यात यावी असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सतीश कापसे यांनी केले आहे.

No comments