Breaking News

ज्ञानदान करणाऱ्या गुरुजींनी दिली कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची भेट

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी केज येथील उपजिल्हा रुग्णालयाला आपल्या वर्गणीतून तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची भेट देण्यात आली.

कोरोना आपत्तीच्या काळात परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तालुक्यात अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना अडचणी निर्माण होत होत्या. याची जाण तालुक्यातील शिक्षकांना होती. 

ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांनी "केज माझा तालुका, माझी जबाबदारी" हा उपक्रम स्वेच्छेने राबवला. तालुक्यातील ३०९ शिक्षकांनी ३ लाख ९६ हजार १९१ रु. अवघ्या पंधरा दिवसां मध्ये स्वच्छेने जमा केले. त्या पैकी बनसारोळा व होळ केंद्रातर्फे दिनांक २४ मे रोजी बनसारोळा कोव्हीड सेंटरला हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या २ मशीन भेट देण्यात आल्या. एक ऑक्सिजन निर्मिती मशीन मानवलोक कोव्हीड केअर सेंटर आंबेजोगाई येथे भेट देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय केज कोव्हीड केअर सेंटर, पिसेगाव कोविड केअर सेंटर, शारदा कोविड केअर सेंटर यांच्यासाठी केज तालुक्यातील इतर सर्व केंद्रातील शिक्षकां तर्फे २ लाख १२ हजार ४६६ रुपयांचे केज तालुक्यातील रुग्णांचे ऑक्सिजन मुळे प्राण वाचावे म्हणून ३ हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारी मशीन. रुग्णाच्या रक्तातील प्राणवायूची पातळी तपासण्यासाठी ऑक्सिमिटर, सॅनिटायझरचे कॅन, २० सॅनिटायझरचे छोटे बॉटल, एन-९५ मास्क, योगा आणि व्यायामासाठी म्युझिक सिस्टीम स्वच्छेने भेट देण्यात आली. 

मागील चौदा महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी अतिशय प्रामाणिकपणे माझे कुटुंब माझी जबाबदारी गाव सर्वेक्षण, मिशन झिरो डेथ गाव सर्वेक्षण, लसीकरण सत्र ठिकाणी लाभार्थ्याची पडताळणी करण्यासाठी कार्य केले आहे. तालुक्यातील रुग्णांची कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची डाटा एंट्री, चेक पोस्टवर ड्युटी, कोरोना चाचणी करताना नोंदी घेणे, होम आयसोलेशनच्या ठिकाणी लक्ष देणे. अशी कर्तव्य प्रामाणिकपणे निभावले आहे. केज तालुक्यातील शेकडो जिल्हा परिषद शिक्षकांच्या मदतीमुळे रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. शिक्षकांनी केलेल्या मदतीमुळे आरोग्य विभागाला खूप मोठा आधार मिळाला आहे. असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी मनोगत व्यक्त केले. 

निधी संकलनासाठी संकेत डोंगरे, विष्णू यादव, राहुल काकनाळे, महादेव ढाकणे, बाबासाहेब केदार, राहुल उंडाळे, युवराज हिरवे, किशोर भालेराव, ज्ञानेेेश्वर इंगळे, श्रीमंत भोसले, बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब गोरे, बाबासाहेब सारुख, बबन राऊत, किसन लोंढे, अरुण पवार यांनी प्रयत्न केले तसेच शेकडो शिक्षकांनी स्वेच्छेने निधी दिला. त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी केले. 

या प्रसंगी नायब तहसीलदार सचिन देशपांडे, गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय केजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सोळुंके, डॉ. केशव इंगोले, डॉ. करपे, डॉ. सावंत, श्रीकृष्ण नागरगोजे यांच्यासह विक्रम डोईफोडे सर, सुरेश काळे,  अर्जुन बोराडे, उद्धवजी थोरात, शृंगारे तसेच पत्रकार श्रावण कुमार जाधव साहेब सौदागर साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रुबा सोनवणे यांनी तर आभार राहुल काकनाळे यांनी व्यक्त केले.  


No comments