Breaking News

अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे केज पोलिसांचे आवाहन

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे वरपगाव रस्त्या लगत उसाच्या बांधावर एक ४० ते ४५ वयाच्या पुरुष जातीचे अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केज पोलिसांनी केले आहे.

दि. १५ मे रोजी केज तालुक्यातील चिंचोली माळी शिवारात वरपगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पश्चिमेला रस्त्यापासून सुमारे २०० मिटर अंतरावर हरिभाऊ गायकवाड आणि सुधाकर गायकवाड यांच्या गट न. २१५ यांच्या सामायिक बांधावर एक ४० ते ४५ वर्ष वयाचे पुरुष जातीचे प्रेत आढळून आले आहे. मयताच्या अंगात लाल चौकडा शर्ट व राखाडी रंगाची नाईट पँट आहे. तसेच डोक्याला ठिपके असलेले स्कार्फ आणि तोंडाला पांढरा मास्क लावलेला आहे. तसेच चेहऱ्यावर खरचटल्याच्या खुणा असून तोंडाला चिखल व माती लागलेली आहे. उजव्या हाताच्या कोपरा जवळ जखम असून पाय पाण्यात भिजल्या सारखे दिसत आहेत. हाताच्या मुठीत मकाचे बियाणे दिसत आहे. सदरील मृत्यु हा पिकाला पाणी देत असताना विजेचा शॉक लागून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असून मयत व्यक्ती ही सालगडी असावी असा कयास आहे. 

सदर मयत व्यक्तीला कोणी ओळखत असेल तर त्यांनी केज पोलीस स्टेशनची संपर्क साधण्याचे आवाहन केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांनी केले आहे. 
No comments