Breaking News

लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्याचा परळी पत्रकार संघाने केला जाहीर निषेध


त्या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची केली तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी

परळी : पत्रकारांवर हल्ले होणे हा प्रकार काही नवा नाही. समाजाला जागृत करण्यासाठी वास्तव लिखाण करणाऱ्या पत्रकारांवर हल्ले अद्यापही होत आहेत. दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी तहसीलदार यांना सोमवारी (दि.३१) दिलेल्या निवेदनाद्वारे येथील पत्रकारांनी केलीय.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांनी 'शेंदाड नाऱ्याचा भयताड पोऱ्या' ह्या मथळ्याखाली लोकपत्र दैनिकातून लिखाण केले. त्यांनी केलेले वास्तव लिखाण माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थकांना झोंबल्याने दैनिक लोकपत्रच्या कार्यालयात जावून रवींद्र तहकीक यांना राणे समर्थकांनी काळे फासण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. याप्रकणी औरंगाबाद येथील  एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात श्री. तहकीक यांच्या तक्रावरुन आरोपी गणेश उगले, निलेश भोसले,बाबुराव वाळेकर, उमेश शिंदे यांच्यासह अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात येत असून आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच यापुढे पत्रकारांवर होणारे असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. असा इशारा परळी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे पत्रकार संघाचे भगवान साकसमुद्रे, सतिष बियाणी, प्रशांत जोशी, संभाजी मुंडे, बाबा शेख, महादेव गित्ते, प्रवीण फुटके, अफसर सय्यद, बाळाजी जगतकर, रामेश्वर कोकाटे, नितीन ढाकणे, वैजनाथ कळमकर, धीरज भराडिया, अनंत गित्ते यांनी दिला आहे.   

No comments