Breaking News

गरजु कुटूबांना किराणा सामान वाटप डॉ. श्रीकांत पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्तचा उपक्रम

बीड :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक डॉ. श्रीकांत पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त राजमुद्रा सामाजिक संघटनाचे स्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक किशोर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहरातील पंधरा कुटूंबियांना दोन महिने पुरेल एवढे किराणा सामान मंगळवारी वाटप करण्यात आले. 
राजमुद्रा सामाजिक संघटनाच्यावतीने गोरगरीब व गरजुंसाठी विविध उपक्रम राबवित असतात. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊन सुरु आहे. ज्या लोकांचे हातावरचे पोट आहे त्यांचे खुप हाल होत आहेत. त्यांना या संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक, बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीकांत पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील पंधरा कुटूंबियांना दोन महिने पुरेल एवढे किराणा सामाज वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. पंडीत हे मुंबईमध्ये राहून कोरोना काळामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासाठी जी काही मदत करता येईल ती मदत करत आहेत. या बद्दल त्यांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष किशोर पिंगळे यांनी केले आहे.


No comments