Breaking News

शिक्षकांच्या वेतन कपातीस मराठवाडा शिक्षक संघाचा विरोध


विद्यार्थी गुणवत्तेचे निमित्त करून शिक्षक विरोधी चाल

मराठवाडा शिक्षक संघ तीव्र आंदोलन उभारणार 

परळी वैजनाथ : शिक्षक प्रशिक्षणाच्या नवीन धोरणा आडून शिक्षकांचे वेतन कपातीचा प्रयत्न शिक्षक कदापि खपवून घेणार नाही. मराठवाडा शिक्षक संघाचा यास विरोधी असून तसा प्रयत्न झाल्यास संघटना त्या विरोधात तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी एस घाडगे आणि सरचिटणीस व्ही. जी. पवार यांनी दिला आहे. 

         या बाबत मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव राजकुमार कदम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की नवीन  शिक्षक प्रशिक्षणाच्या बाबतीत शासनाने सूतोवाच केले आहे. या मधे शिक्षक प्रशिक्षणा ऐवजी शिक्षक वेतन कपातीचेच हे धोरण असल्याचे दिसून येत आहे. शिक्षकांनी सुमारे अर्धशतकाहून अधिक काळ केलेल्या संघर्षातून सेवाशाश्वती, केंद्रा प्रमाणे वेतन आणि भत्ते हे सुत्र मिळवले मात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरी नुसार शिक्षकांचे मूल्यमापन व त्यावर आधारित शिक्षकांचे वेतन निश्चित करण्याचे हे नवीन शिक्षक प्रशिक्षण धोरण आहे. 

मराठवाडा शिक्षक संघाने याचा निषेध करताना म्हटले आहे की विद्यार्थी गुणवत्ता वाढली पाहिजे या बाबत आमचे दुमत नाही.  उलट त्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात. परंतु  शिक्षणाची गुणवत्ता कशी ढासळली जाईल अशीच धोरणे राज्यकर्ते आखत आणि राबवत आहेत. एकीकडे शिक्षणावरील तरतुदींना कात्री लावत असताना शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा बोजा सातत्याने वाढवला जात आहे. गरीबीमुळे अनेक विद्यार्थी शाळेत येऊ शकत नसल्याने त्याचाही परिणाम गुणवतेवर होतोच. त्यामुळे शिक्षणावरील आर्थिक तरतूद वाढवावी, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा बोजा कमी करावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने केली आहे.

 नवीन प्रशिक्षणाच्या नावाखाली शिक्षकांचे वेतन कपातीचा प्रयत्न केल्यास शिक्षक खवळून उठेल आणि मराठवाडा शिक्षक संघ अशा शिक्षक विरोधी धोरणा विरोधात तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा  मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी एस घाडगे सरचिटणीस व्ही.जी. पवार, जिल्हाध्यक्ष डी.जी.तांदळे, जिल्हा सचिव राजकुमार कदम, अशोक मस्कले, सुरेश काजळे, एस.जी.स्वामी, नागनाथ तोंडारे, चंद्रशेखर साखरे, त्रिंबक इजारे, कालिदास धपाटे, गणेश आजबे, नामदेव काळे, बंडू आघाव, काळबा कसबे,सोपान निलेवाड,महादेव धायगुडे, परवेझ देशमुख, अलिशान काजी, राजकुमार लाहोटी, राजेश साखरे, अविनाश लोणीकर, बंडू चव्हाण, श्रीहरी दहिफळे, ज्ञानोबा गडदे, अनंत मुंडे, युवराज मुरूमकर, विनोद सवासे, एल.ए. जाधव, उल्हास जोशी, बब्रुवान पोटभरे, व्यंकटराव धायगुडे, सुभाष शेवाळे, दादासाहेब घुमरे, आय.जे.शेख, एम.डी.डोळे, महादेव शिंदे, गोवर्धन सानप, सावंत आर.एन, अश्विन गोरे, दिपक सोळंके, अंडील एम, आपेट ध.प. यांनी दिला आहे. 

No comments