Breaking News

शिरूर येथील लसीकरणाला लागली शिस्त;पण आत्ता सावली आणि पाण्याचा प्रश्न?


बाळकृष्ण मंगरुळकर । शिरूर कासार

शिरूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी गुरुवार दि 6 रोजी मोठ्या प्रमाणावर  लसीकरणाच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गर्दी होत असून कोरोना चा धोका त्यामुळे वाढू शकतो. अशा बातम्या आल्या नंतर लसीकरणाच्या ठिकाणी आता शिस्त दिसून येत आहे. मात्र येणाऱ्या नागरिकांना सावली आणि पाण्याचा प्रश्न अद्यापही तसाच असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. 

तसेच अपुरा लस साठा असल्यामुळे नागरिकांची गर्दी लसीकरणाच्या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी अंतर पाळले जात नसल्याच्या बातम्या वृत्तपत्रात छापून आल्या होत्या. त्यानंतर संबंधितांनी लक्ष घालून लसीकरणाला सिस्टीम मध्ये सुरुवात केली आहे. असे असले तरीही जिल्हा परिषदेने सात मे रोजी पत्र देऊनही तालुक्यांमधील लसीकरण केंद्राच्या ठिकाणी नागरिकांना पाणी आणि सावलीसाठी मंडपची सुविधा कालपर्यंत करण्यात आली नव्हती. मात्र पंचायत समिती कार्यालयाकडून याबाबत संबंधित ग्रामपंचायतला सूचना देण्यात आल्या होत्या.परंतु लॉक डाऊन असल्याने अडचणी येत आहेत असे समोर आले आहे.

दोन दिवसात होणार सोय ! 

लॉक डाऊन मुळे सर्व दुकाने बंद असल्याने सावलीसाठी मंडपाचे कापड उपलब्ध करण्यासाठी अडचणी येत आहेत. परंतु रीतसर तहसिलदार साहेब यांची परवानगी घेऊन दुकान उघडून व्यवस्था केली जाईल.यासाठी मी स्वतः पुढाकार घेत असल्याचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी. टी. चव्हाण म्हणाले. 

No comments