Breaking News

कोरेगाव येथे शेतातील सामाईक पाईप लाईन फोडल्याच्या वादातून कोयत्याने हल्ला !


तिघा विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

गौतम बचुटे । केज 

केज तालुक्यातील कोरेगाव येथे सामाईक पाईप लाईन फोडल्याच्या वादातून तिघांनी झोपेत असलेल्या एकावर कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याच्या प्रयत्न करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. 

या बाबतची माहिती अशी की, कोरेगाव ता. केज येथे धनराज युवराज तांदळे व अविनाश विठ्ठल तांदळे हे दोघे सख्खे चूलतभाऊ भाऊ असून यांची शेजारी जमीन आहे. त्या दोघात सामाईक विहीर असून त्यात सामाईक पाईप लाईन केलेली आहे. परंतु मागील सात महिन्या पासून अविनाश तांदळे हा धनराज तांदळे यांना विहीर व पाईप लाईनच्या वापर करू देत नव्हता; म्हणून धनराज युवराज तांदळे याने ती पाईप लाईन फोडली. त्याचा राग मनात धरून दिनांक २० मे बुधवार रोजी धनराज तांदळे, त्याचा भाऊ राम तांदळे व आतेभाऊ जगन्नाथ तोंडे हे घरा समोर झोपलेले असताना रात्री १२:१५ वा. च्या दरम्यान अशोक विठ्ठल नेहरकर (रा. पिसेगाव ता. केज), अविनाश बाबासाहेब तांदळे (रा. कोरेगाव ता. केज) आणि बप्पा शामराव तोंडे (रा. सोनिमोहा ता. धारूर) या तिघांनी संगणमत करून पाईप लाईन का फोडली ? या कारणा वरून अशोक विठ्ठल नेहरकर याने धनराज युवराज तांदळे याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. तो वाढ चुकवीत असताना धनराज याच्या डोक्याच्या उजव्या बाजूला व डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. आवाज ऐकूण धनराज तांदळेचा भाऊ राम तांदळे व आतेभाऊ जगन्नाथ हे जागे झाले असता हल्लेखोर पळून गेले.

सदर प्रकरणी धनराज युवराज तांदळे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात अशोक विठ्ठल नेहरकर (रा. पिसेगाव ता. केज), अविनाश बाबासाहेब तांदळे (रा. कोरेगाव ता. केज) आणि बप्पा शामराव तोंडे (रा. सोनिमोहा ता. धारूर) या तिघांच्या विरुद्ध संगणमत करून धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत करून मारहाण करणे, शिवीगाळ करणे व जीवे मारण्याची धमकी देणे. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गु.र.न. २५२/२०२१ भा. दं. वि. ३०७, ३२६, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत. 

No comments