Breaking News

झोपीत असलेल्या निरागस मुलीच्या इजतीवर हैवनाचा डाव टाकण्याचा प्रयत्न

नराधमाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल 

बाबासाहेब देशमाने । दिंद्रुड  

घराच्या अंगणात आई वडिलांसह झोपीत असलेल्या अल्पवयीन मुलीची शेजाऱ्याकडे आलेल्या नराधम पाहुण्याने मध्यरात्री तिच्या जवळ आला. ती झोपीत असल्याची संधी साधून त्या हैवानं तिची छेड काढून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र सावध झालेल्या त्या अल्पवयीन मुलीने आरडाओरडा करताच शेजारीच झोपीत असलेले तिचे वडील जागी झाले अन त्या हैवनाने तेथून पळ काढला. ही घृणास्पद घटना गुरुवारी माजलगाव तालुक्यात घडली. दरम्यान याप्रकरणी पीडित मुलीसह तिच्या आई- वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून  पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

मिळालेल्या माहितीनुसार माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात मामाच्या घरी त्याचा भाचा आला होता. मामाच्या घराशेजारी राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मात्र त्या नराधम भाच्याची नजर पडली. गुरुवारी रात्री उकाडा होत असल्याने ती अल्पवयीन मुलगी आपल्या घरा समोरील अंगणात आपल्या आई- वडिलांसह झोपली होती. अंधाराचा फायदा घेऊन मध्यरात्री शेजारी आलेल्या त्या नराधमाने झोपीत असलेल्या त्या मुलीच्या जवळ जावून तीला  लज्जा वाटेल अशा प्रकारे कृत्य करुन विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलीने आरडा ओरडा केल्याने शेजारी झोपलेल्या तिच्या वडिलांनी तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून कोण आहे?  म्हणताच, अंधाराचा फायदा घेत आरोपीने तेथून पलायन केले.

त्यानंतर झाला प्रकार पीडित मुलीने आपल्या आई - वडिलांना सांगितला. रात्री उशीर झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी पिडीत  मुलगी व तिच्या आई- वडीलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून दिंद्रुड पोलिस ठाण्यात नराधम आरोपी विरुद्ध  बप्पा  भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३५४, ३५४ A तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेनंतर नराधम आरोपी फरार झालाय. पोलिस त्याचा शोध घेत असून पुढील तपास सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे करीत आहेत.

No comments