Breaking News

कोर्टातील दावा काढून घे म्हणत महिलेचा केला विनयभंग

गौतम बचुटे । केज 

कोर्टात सुरू असलेला दावा काढून घे; म्हणून केज तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कोरेगावमध्ये दि.३० एप्रिल रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास एका २५ वर्षीय महिलेचा तिच्या घरा समोर असताना एका नराधमाने तिने कोर्टात दिलेला दावा काढून घे. असे म्हणून विनयभंग केला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत शिवीगााळ केली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादी वरून केज पोलिस ठाण्यात अभिमान येडबा घुले याच्या विरुद्ध गु.र.नं. २१६/२०२१  भा दं वि ३५४, ३५४(अ) (२), ३२३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करून पोलीस कॉन्स्टेबल दिनकर पुरी हे पुढील तपास करीत आहेत.

No comments