Breaking News

पोटच्या गोळ्याची तमा न बाळगता 'तिनं' केलं पलायन...

विवाहित महिला प्रियकरासोबत झाली सैराट..!

गौतम बचुटे । केज 

प्रियकराच्या प्रेमापोटी आपल्या पोटच्या गोळ्याची तमा न बाळगता एका आईने तिच्या प्रियकरासोबत पलायन केले. वात्सल्याला काळिमा फासणाऱ्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे. दरम्यान त्या मातेला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.  

मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यतील एका गावातून विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात तिच्या नवऱ्याने दाखल केली. त्यानंतर केज पोलीस त्या विवाहित महिलेचा शोध घेऊ लागले. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत असताना 'त्या' महिलेने अवघ्या दीड वर्षाच्या आपल्या मुलाला त्याच्या वडिलांजवळ सोडून 'तिने' कोणतीही तमा न बाळगता तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेची अधिक माहिती पोलिस घेत असताना 'त्या' विवाहित महिलेचा प्रियकर हा ही विवाहित असल्याची माहिती  पोलिसांसमोर आली. दरम्यान विवाहित प्रियसी आणि तिचा प्रियकर सातारा जिल्ह्यात असल्याची खात्रीशिर माहिती केज पोलिसांना मिळाली. 

त्या नुसार पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी तपासाची चक्रे अधिक फिरवून पो. कॉ.  दिनकर पुरी आणि मंदे यांनी सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठ येथे जाऊन शोध घेऊ लागले. मल्हारपेठ मधील एका खोलीत विवाहित असलेले हे दोघे (प्रियसी आणि तिचा प्रियकर) राहत असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. याची खात्री पटताच पोकॉ. दिनकर पुरी आणि मंदे यांनी  मल्हारपेठ येथून या जोडप्याला ताब्यात घेतले. प्रियकराच्या प्रेमाला भुललेल्या त्या मातेनं मात्र निरागस असलेल्या आपल्या बाळाला टाकून पळ काढल्यानं सर्वत्र संताप व्यक्त केल्या जातोय.

दरम्यान ते प्रेमी युगुल केज पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान ह्या गुन्ह्याचा छडा लावण्यात केज पोलिसांना यश मिळाले असून या प्रकरणाला मात्र वेगळीच कलाटणी मिळाली आहे. त्या महिलेने तक्रार दाखल केली आहे, की बंडू राजाभाऊ चौरे (रा. जिवाचीवाडी) आणि सहदेव आश्रूबा आंधळे (रा. आंधळेवाडी)  या दोघांनी संगनमत करून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन बंडू राजाभाऊ चौरे याच्या मोटरसायकलवर बसवून तिला सातारा जिल्ह्यातील मल्हारपेठ ता. कऱ्हाड येथे नेऊन एका खोलीत तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला असून ती गर्भवती असल्याचे माहीत असताना ही तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान तिच्या तक्रारीवरून बंडू राजाभाऊ चौरे व सहदेव आश्रूबा आंधळे यांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत हे पुढील तपास करीत आहेत.No comments