Breaking News

जनसेवेसाठी तत्पर नेतृत्व आ.विनायकराव मेटे साहेब : राजेंद्र आमटे


रुग्णांनासाठी मोफत कोविड केअर सेंटर 

बीड :  आज करोना मुळे संपूर्ण देश हैराण झाला आहे अनेक ठिकाणी रुग्णांना बेड, उपलब्ध नाहीत, ऑक्सीजन उपलब्ध होत नाही , खाजगी कोविड सेंटर मध्ये रुग्णांना कडून वारे माफ फिस घेतली जाते या सर्व पार्श्वभूमीवर रुग्णांना साठी मोफत कोविड सेंटर सुरू करण्याचे काम आ .विनायकराव मेटे साहेब यांनी केले आहे. सामाजिक बांधिलकी,समाजसेवा यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात आपला राजकिय ठसा उमटवणारे मा. आ.विनायकराव मेटे साहेब यांनी कायम जनसेवेचा वारसा कै. आण्णासाहेब पाटील यांच्या प्रेरणेतून घेतला  गोर गरीबाना आपल्या मुलीच्या विवाह साठी कर्ज बाजरी होऊन विवाह करावे लागत या करिता गोर-गरीब मुलीच्या विवाह साठी  सामूहिक विवाह सोहळा आयोजन करणे, सर्व धर्म विवाह सोहळा आयोजित करणे मुस्लिम समाजातील मुलींना साठी सामूहिक विवाह सोहळा असे एक नव्हे अनेक सामाजिक कार्यक्रम आ.विनायकराव मेटे साहेब यांनी राबवले. 

       31 डिसेंबर रोजी नवीन तरुण एन्जॉय म्हणून व्यसनाकडे वळले जातात म्हणून आ विनायकराव मेटे साहेब यांनी तरुणांसाठी व्यसनमुक्ती संगीत रजनी कार्यक्रम मेटे साहेब राबवत आहेत. मराठा आरक्षण,mpsc परीक्षा तरुणांची वय मर्यादा वाढ करने,शेतकऱ्यांना पेंशन देण्याची मागणी, तरुणांना रोजगार द्या किंवा बेरोजगार भत्ता ध्या असे अनेक,सांगली पूरग्रस्तांना मदत करणे, भव्य नेत्र तपासणी व शास्त्रीय शिबीर, रक्तदान शिबिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरची  स्वच्छता करणे, बिंदुसरा नदी सफाई करणे एक नव्हे अनेक  सामाजिक उपक्रम राबवणारे आ.मेटे साहेब यांची  जनसेवेसाठी  तत्परता दिसते.

आ.विनायकराव मेटे साहेब यांनी कोविड संदर्भात शासकीय हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णांनाची हेळसांड होते हे लक्षात घेऊन कसलाही विलंब न लावता 200 बेडच कै.अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठान च्या माध्यमातून मोफत  जिजाऊ  कोविड सेंटर दि 05 मे रोजी बीड जिल्ह्यातील रुग्णांना साठी सुरू करत आहेत. गोर-गरीब रुग्णांना साठी सर्व सुविधांनी युक्त मोफत कोविड सेंटर जिजाऊ पब्लिक स्कूल वासनवाडी फाटा सुरू करत आहेत यातून आ.विनायकराव मेटे साहेब यांची जनसेवेसाठी ची तत्परता दिसून येते 

           

   

No comments