Breaking News

कुंपणानेच शेत खाल्ले : वीज वितरणाचा प्रधान तंत्रज्ञच निघाला वीज चोर !

बेकायदेशीररित्या विद्युत जोडणी प्रकरणी वीज वितरणच्या प्रधान तंत्रज्ञानासह अकरा शेतकऱ्यावर गुन्हा दाखल 

   

गौतम बचुटे । केज 

परवानगी नसताना विनापरवाना शेतकऱ्यांना पैसे घेऊन डीपी व विद्युत तारा देऊन वीज पुरवठा दिल्या प्रकरणी वीज वितरण कंपनीच्या एका प्रधान तंत्रज्ञानासह अकरा शेतकऱ्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या बाबतची माहिती अशी की लिंबाचीवाडी व दहिफळ वडमावली येथे वीज वितरणाची कोणतेही अधिकृत मंजुरी किंवा परवानगी नसताना विज वितरण कार्यालयातील प्रधान तंत्रज्ञ सय्यद वहीदुद्दीन सय्यद सइदुद्दीन  (शहेनशाह नगर, बीड) यांनी दहिफळ व लिंबाचीवाडी येथील ११ शेतकऱ्यां कडून अनधिकृतपणे १२ हजार रुपये घेऊन त्यांना ३ विद्युत रोहित्र (डीपी) व तारा देऊन विनापरवाना बेकायदेशीररित्या त्यांच्या विद्युत पंपाला विज जोडणी करून दिली. 

या प्रकरणी नांदुरघाट कार्यालयातील वीज वितरण कंपनीचे पथक प्रमुख साईराज किशोर नागवेकर यांच्या फिर्यादी नुसार केज येथील वीज वितरण कार्यालयातील प्रधान तंत्रज्ञ सय्यद वहीदुद्दीन सय्यद सईदुद्दीन (रा. शहेनशाह नगर बीड) यांच्यासह रामहरी प्रल्हाद सुरवसे (रा. दहिफळ वडमावली ), बाबासाहेब रावसाहेब माने, मुकुंद भास्कर माने, विक्रम नामदेव काकड, महारुद्र भानुदास काकड, नानाभाऊ नामदेव माने, कमराव माने, श्रीकांत माने, नितीन माने, बाबुराव माने आणि अभिमान हराळे सर्व राहणार लिंबाचीवाडी तालुका केज यांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३५६/२०२१ भा.द.वि. ४०९, ३६ आणि विद्युत कायदा कलम १३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार मुकुंद ढाकणे हे पुढील तपास करीत आहेत. 

No comments