Breaking News

विधानसभा मतदार संघातील ज्या धरणात ५० टक्क्यापेक्षा जास्त पाणी आहे ते पाणी नद्यांना सोडावे - माजी आ.भीमसेन धोंडे यांची मागणी

के. के. निकाळजे । आष्टी

सध्या काही गावात पिण्याची पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदार संघातील ज्या धरणात ५० टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा आहे आणि धरणातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी मागणी केली तर हे पाणी नद्यांनी सोडण्यात यावे जेणेकरुन पिण्याची पाणीटंचाई दुर होईल आणि काही प्रमाणात शेतीला पाणी मिळेल म्हणुन मतदार संघातील जेथील पाणी सोडता येईल तेथे काही प्रमाणात पाणी सोडावे अशी मागणी बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्याकडे भाजपा नेते माजी आ.भीमसेन धोंडे यांनी केली.

          सध्या आष्टी तालुक्यातील मेहकरी प्रकल्पात ७० टक्के पाणीसाठा असून धरणाच्या लाभक्षेत्रातील  सराटेवडगाव, आनंदवाडी, रुईनालकोल, नांदा या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांचे सरपंच यांनी पाणी सोडावे अशी आपणाकडे मागणी केलेली आहे. या गावांसाठी नदीद्वारे पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अन्यथा टँकर सुरु करावे लागतील बीड जिल्ह्यात नुकतेच माजलगाव प्रकल्पातील पाणी या प्रकारे त्या भागातील गावांसाठी सोडलेले आहे. मेहकरी प्रकल्पाचे पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र लोकरे यांना सूचना द्यावी अशी मागणी माजी आ.भीमसेन धोंडे यांनी केली आहे.


No comments