Breaking News

बुद्ध जयंतीनिमित्त ऑनलाइन व्याख्यानमाला

बीड :  प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था बीड आयोजित तथागत सम्यक सम्बुद्ध यांच्या 2565 व्या जयंती निमित्ताने ऑनलाइन बुद्ध पोर्णिमा महोत्सव 2021 चे आयोजन पर पाच दिवशीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.

 ही व्याख्यानमाला दि. 25 मे 2021 ते दि. 29 मे 2021 रोजी सम्यक संकल्प फेसबूक लाईव्ह व गुगल मीट http://meet.google.com/fex-oyrm-ukb या संकेत स्थळावरून थेट प्रक्षेपण रोज सायं. 07 वाजता होणार आहे.

दि.25/05/2021 सायं. 07  वा. प्राचार्य डॉ. भदंत खेमधम्मो महाथेरो, मुळावा. विषय: तथागतांनी सांगितलेला मध्यम मार्ग  दि. 26/05/ 2021 सायं. 06 वा.  पु.डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, पूर्णा विषय: जीवन जगण्याचे यथार्थ ज्ञान देणारा-बुद्ध जीवनमार्ग दि. 27/05/ 2021 सायं. 07  वा. पु. भिक्खु धम्मधर थेरो, जालना विषय: माता रमाई जीवन आणि संघर्ष दि.28/05/ 2021 सायं. 07  वा. पु.भिक्खु एन. धम्मानंद, औरंगाबाद विषय:  बौद्ध संस्कृतीतील विविध प्रतिके व प्रतिकात्मक बौद्ध धम्म दि. 29/05/2021 सायं.07 वा. पु.भिक्खु धम्मशील,  हिंगोली/बीड विषय: तथागत उपदेशीत समतावादी सिद्धांत. धम्म उपासक-उपासिका व सर्व धम्म अनुयायांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा,असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य संयोजक पु.भिक्खु  धम्मशील (सचिव), आयु.प्रा.प्रदीप रोडे (उपाध्यक्ष) व प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था बीड चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.


No comments